Pune Crime: बिल कमी करण्याच्या मागणीवरून वाद; पुण्यातील रुग्णालयाच्या वरिष्ठ डॉक्टराने समाजसेवकावर पिस्तूल रोखल्याचा आरोप

हडपसरमधील विलू पूनावाला हॉस्पिटलमधील प्रकार; डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल, पिस्तूल परवाना व सीसीटीव्ही फुटेजची पोलिसांकडून तपासणी
Gun
GunPudhari
Published on
Updated on

पुणे: मित्राच्या आईचे निधन झाल्‍यानंतर रुग्णालयातील बिल कमी करण्याच्या मागणीसाठी गेलेल्या समाजसेवकावर चक्क रुग्णालयाच्या डॉक्‍टर असलेल्‍या वरिष्ठ अधिकाऱ्यानेच पिस्तूल रोखल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हडपसर येथील विलू पूनावाला हॉस्पिटलमध्ये हा प्रकार घडला.

Gun
Pune Municipal Hospital Medicine Issue: पुणे महापालिका दवाखान्यांचा धक्कादायक कारभार! कफ सिरपसाठी रुग्णांकडून आणल्या जात होत्या बाटल्या, मलम कागदात

बिल कमी करण्याची विनंती करण्यासाठी गेलेल्या तरुणाच्या छातीला पिस्तूल लावून जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात डॉ. आर्या लजपतराय (वय ५८, सीओओ, विलू पूनावाला हॉस्पिटल) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Gun
Pune Flood Rehabilitation: घोषणा हवेतच! सिंहगड रस्त्यावरील १,३८३ कुटुंबांचे पुनर्वसन रखडले; ३०० कोटींचा पूरप्रतिबंधक प्रकल्पही मंत्रालयात अडकला

सामाजिक कार्यकर्ते प्रतीक उत्तम कांबळे (वय ३३, रा. कॅम्प, पुणे) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतीक कांबळे यांच्या मित्राच्या आईवर विलू पूनावाला हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यानंतर हॉस्पिटलचे बिल कमी करण्यात यावे, या मागणीसाठी प्रतीक कांबळे हे १६ जुलै रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावरील डॉ. आर्या लजपतराय यांच्या केबिनमध्ये गेले होते. बिल कमी करण्याबाबत चर्चा सुरू असतानाच वाद निर्माण झाला.

Gun
Shravani Kudale NEET 2026: दररोज 6 तास अभ्यास, युट्यूबऐवजी पुस्तकांवर भर; नीटमध्ये बाजी मारणाऱ्या श्रावणीचा पुढचा प्लान काय?

या वेळी डॉ. आर्या यांनी बिलामध्ये कोणतीही कपात करणार नसल्याचे सांगत प्रतीक यांना तेथून जाण्यास सांगितले. मात्र, त्यानंतर परिस्थिती चिघळली आणि डॉक्टरांनी आपल्या जवळील पिस्तूल बाहेर काढून थेट प्रतीक कांबळे यांच्या छातीला लावल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. रुग्णालयासारख्या संवेदनशील ठिकाणी वरिष्ठ डॉक्टरानेच शस्त्र रोखल्याच्या घटनेने उपस्थितांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

Gun
Sant Tukaram Maharaj Palkhi: इंदापुरात संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात दुसरे गोल रिंगण उत्साहात; अश्वांच्या टापांनी भक्तीचा रंग चढला

या प्रकाराची माहिती मिळताच हडपसर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी रुग्णालयाची पाहणी करून संबंधितांकडून माहिती घेतली आहे. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी डॉ. आर्या लजपतराय यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३५१(३), ३५२ तसेच शस्त्र अधिनियम कलम ३० अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पिस्तूल परवाना, घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आणि संबंधित व्यक्तींचे जबाब याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news