

पुणे: गुलटेकडी मार्केट यार्डातील गूळ बाजारात हलक्या गुळाची आवक मोठया प्रमाणात होत असून, दरातील मंदी कायम आहे. आंबेमोहोर तांदळाचे दरही कमी झाले. मात्र, तुटवड्यामुळे तुरडाळीचे दर तेजीत असून, दरात आणखी दोनशे रुपयांनी वाढ झाली. आवक-जावक साधारण असल्यामुळे साखर, खाद्यतेल, अन्नधान्ये या जिनसांचे दर स्थिर असल्याचे येथील घाऊक बाजारातून सांगण्यात आले.
सध्या सर्वत्र गुऱ्हाळे जोरात सुरू असून, बाजारात आवक मोठया प्रमाणात होत आहे. हलक्या प्रतीच्या गुळाचे उत्पादन अधिक होत आहे, यामुळे बाजारात या गुळाची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. मात्र सध्या कोणतेही सण उत्सव नसल्याने उठाव कमी आहे. यामुळे हलक्या गुळाचे दर मोठया प्रमाणात घसरले असून गेल्या आठवडयातही ही स्थिती कायम होती. आवक मुबलक प्रमाणात होत असून मागणी कमी असल्यामुळे गेल्या आठवडयातही साखरेचे दर मंदीतच होते. शनिवारी येथील घाऊक बाजारात एस 20 साखरेचा प्रती क्विंटलचा दर 4000 ते 4050 रुपये होता.
खाद्यतेले स्थिर : आयाती खाद्यतेलांवरील आयातशुल्क वाढणार, अशी अफवा पसरल्याने गेल्या आठवड्याच्या मध्यास खाद्यतेलांचे दर काही प्रमाणात वाढले होते. मात्र प्रत्यक्षात असे काहही घडले नाही, यामुळे शनिवारी हे दर पूर्वपदावर आहे. एकूणच सध्या बाजारात आवक-जावक साधारण आहे, यामुळे दरात विशेष फेरबदल झाला नाही, असे सांगण्यात आले.
येथील घाऊक बाजारातील शनिवारचे दर पुढीलप्रमाणे होते साखर (प्रतिक्विंटल) 4000-4025 रु. खाद्यतेले (15किलो/लिटर):- शेंगदाणा तेल 2375-2475, रिफाईंड तेल 2150-2750, सरकी तेल 2075- 2375, सोयाबीन तेल 1900-2125, पामतेल 1875-2075, सूर्यफूल रिफाईंड तेल 2100-2250, खोबरेल तेल 5800 वनस्पती 1830-2080 रु. तांदूळ:- गुजरात उकडा 3500-4000, मसुरी 3500-4000, सोना मसूरी 4500-5000, एच.एम.टी. कोलम 5500-6500, लचकारी कोलम 6500-7000, चिन्नोर 4500-5000, 1121-11000-11500, आंबेमोहोर (सुवासिक) 12500-13000, बासमती अखंड 12000-13000, बासमती दुबार 9500-1000, बासमती तिबार 10000-10500, बासमती मोगरा 5500-6500, बासमती कणी 4000-4500, 1509-8500-9500, इंद्रायणी 5500-6000 रु. गहू - लोकवन नं. 1 4000-4200, लोकवन नं. 2 3600-40020, नं.3 3300-3600, सिहोर नं. 1 5700- 6000, सिहोरी 3800-4400, मिलबर 3100 रु.
ज्वारी :- गावरान नं. 1 5700-6200, गावरान नं.2 5200-5500, नं.3 4700-5100, दूरी नं.1 3800-4000, दूरी नं. 2 3500-3700 रु बाजरी:- महिको नं.1 4000-4200, महिको नं.2 3600-3800, गावरान 3300-3500, हायब्रीड 3200-3300 रु. गूळ :- गूळ एक्स्ट्रा 4650-4750, गूळ नं. 1 4400-4600, गूळ नं.2 4000-4250 गूळ नं.3 3750-3950, नं. 4 - 3400-3600, चिक्की गूळ 10/ 30 किलो 4500-4700, चिक्की गूळ एक व अर्धा किलो 4800-5200 रु. डाळी:- तूरडाळ 9000-11000, हरभराडाळ 6800-7000, मूगडाळ 9000-10000, मसूरडाळ 7600-7700, मटकीडाळ 8300-8400, उडीदडाळ 9000-10300 रु. कडधान्ये:- हरभरा 6500-6600, हुलगा 4800-5000 चवळी 7000-9500, मसूर 6900-7000, मूग 9000-9500, मटकी गावरान 12000, मटकी पॉलिश 6800-7000, मटकी गुजरात 6800-7000, मटकी राजस्थान 6800-7000, मटकी सेलम 15200-16000, वाटाणा हिरवा 12500-13000, वाटाणा पांढरा 4400-4500, काबुली चणा 7500-11000 रु. साबुदाणा :-साबुदाणा नं.1 5000, साबुदाणा नं.2 4750, साबुदाणा नं.3 4500 रु.वरई भगर :-9500-10500, सावा भगर 9000-9500 रु .
तुटवड्यामुळे तूरडाळीची दरवाढ
हंगामाचा अखेरचा कालावधी असल्यामुळे बाजारात सध्या तुरडाळीचा तुटवडा जाणवत आहे. यामुळे गेल्या आठवड्यातही भारी तुरडाळीच्या दरात क्विंटलमागे आणखी दोनशे रुपयांनी वाढ झाली. मात्र, आवक-जावक साधारण असल्याळे हरभराडाळ, मूगडाळ, मसूरडाळ, मटकीडाळ आणि उडीदडडाळीचे दर स्थिर होते. मटकी, वाटाणा, काबुली चणा इत्यादी कडधान्यांच्या दरातही फारसा बदल आढळला नाही. तुटवड्यामुळे गावरान ज्वारीचे दर उच्चांकी पातळीवर पोहचले आहेत. गेल्या आठवडयात ही स्थिती कायम होती. थंडीमुळे बाजरीला मागणी चांगली असून, दरातील तेजी कायम आहे. गव्हाच्या दरात कोणताही बदल आढळला नाही. लवकरच तांदळाचा नवा हंगाम सुरू होणार आहे. या मुळे तांदळाच्या दरातही फारसा बदल आढळला नाही. आंबेमोहोर तांदळाची उत्पादन केंद्रात आवक सुरू झाली असून, येत्या काही दिवसात बाजारात नवा आंबेमोहोर तांदूळ उपलब्ध होईल, असा अंदाज आहे. यामुळे आंबेमोहोर तांदळाचे दर कमी झाल्याचे सांगण्यात आले.