

पुणे: गुलटेकडी मार्केट यार्डातील फळबाजारात थंडीमुळे फळांच्या आवकेवर काहीसा परिणाम झाला आहे. रसदार फळांच्या खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरविल्याने खरेदीदारांनी फळांची खरेदी कमी केल्याचे चित्र आहे. बाजारात होत असलेल्या मागणीच्या तुलनेत आवक कमी पडल्याने लिंबू, मोसंबी, खरबूज, पपई, पेरू आणि सिताफळाच्या भावात पाच ते दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. उर्वरित सर्व फळांची आवक जावक कायम असल्याने दर टिकून होते.
गुलटेकडी येथील मार्केट यार्ड येथील फळबाजारात रविवारी (दि. 14) फळबाजारात मोसंबी 50 ते 50 टन, संत्रा 15 ते 20 टन, डाळिंब 30 ते 35 टन, पपई 4 ते 5 टेम्पो, लिंबाची सुमारे एक हजार ते बाराशे गोणी, कलिंगड 8 ते 10 टेम्पो, खरबूज 5 ते 6 टेम्पो, चिकू एक ते दीड हजार गोणी, पेरू 800 क्रेट, अननस 6 ट्रक, बोरे 400 ते 450 पोती, तर गोल्डन सीताफळाची 15 ते 20 टन इतकी आवक झाली होती, अशी माहिती मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांनी दिली.
फळांचे भाव पुढीलप्रमाणे:
लिंबे (प्रतिगोणी) : 300-400, मोसंबी : (3 डझन) : 150-350, (4 डझन) : 80-200, संत्रा : (10 किलो) : 400-1000, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : 100-250, आरक्ता : 10-60, गणेश : 5-30, कलिंगड : 12-20, खरबूज : 25- 45, पपई : 10-25, चिकू (दहा किलो) : 100-600, पेरु (20 किलो) : 400-600, अननस (1 डझन): 100-600, गोल्डन सीताफळ (1 किलो) : 20-60, बोरे (10 किलो) : चमेली 250-320, चेकनट 700-800, उमराण 70-90, चण्यामण्या 600-700.