

पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोमवारी १५ डिसेंबरला पुणे पुस्तक महोत्सवाला भेट देऊन प्रकाशक आणि वाचकांशी संवाद साधणार आहेत.
या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडेलिखित 'गिनीजगाथा' या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. या पुस्तकात लोकसहभागातून साकारण्यात आलेल्या १२ गिनीज विश्वविक्रमांचा प्रवास आहे.
महोत्सवाच्या माध्यमातून मागील २ वर्षांत ९ पेक्षा जास्त गिनीज विश्वविक्रम साकारण्यात आले आहेत.