

पुणे: गुलटेकडी मार्केट यार्डातील भुसार बाजारात आवक मुबलक असून, मागणी कमी असल्याने हरभराडाळीच्या दरात आणखी दोनशे रुपयांनी घट झाली. यामुळे बेसनही शंभर रुपयांनी कमी झाले. नव्या तुरीची आवक होण्यास प्रारंभ झाला आहे. हिरवा वाटाणा आणि सेलम मटकीचे दरही आणखी उतरल्याचे सांगण्यात आले. मात्र, शेंगदाणा तेलाच्या दरात 15 किलोमागे 25 रुपयांनी वाढ झाली.
आयात मोठ्या प्रमाणात होत असून, मागणी कमी असल्याने हरभरा डाळीच्या दरात घसरण सुरूच आहे. गेल्या आठवड्यातही दरात क्विंटलमागे आणखी दोनशे रुपयांनी घट झाली. यामुळे बेसन दरातही 50 किलोमागे शंभर रुपयांनी घट झाली. नवीन तुरीची तुरळक प्रमाणात आवक सुरू झाली असून, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात नवीन तुरडाळ बाजारात उपलब्ध होईल, असा अंदाज आहे. यामुळे तुरडाळीची दरवाढ थांबली असून, गेल्या आठवड्यात दरात काही प्रमाणात घट झाली. आवक मुबलक असून, मागणी कमी असल्याने हिरव्या वाटाण्याचे दर क्विंटलमागे 500 ते 1000 रुपयांनी तर काबुली हरभऱ्याचे दर 500 रुपयांनी उतरले. आवक- जावक कमी असल्याने गहू, ज्वारी, बाजरी तसेच तांदळाचे दर स्थिर होते.
येथील घाऊक बाजारातील शनिवारचे दर पुढीलप्रमाणे होते
साखर (प्रतिक्विंटल) 4000-4025 रु. खाद्यतेले (15किलो/लिटर):- शेंगदाणा तेल 2400-2500, रिफाईंड तेल 2150-2750, सरकी तेल 2075- 2375, सोयाबीन तेल 1900-2125, पामतेल 1875-2075, सूर्यफूल रिफाईंड तेल 2100-2250, खोबरेल तेल 5800 वनस्पती 1830-2080 रु. तांदूळ:- गुजरात उकडा 3500-4000, मसुरी 3500-4000, सोना मसूरी 4500-5000, एच.एम.टी. कोलम 5500-6500, लचकारी कोलम 6500-7000, चिन्नोर 4500-5000, 1121-11000-11500, आंबेमोहर (सुवासिक) 12500-13000, बासमती अखंड 12000-13000, बासमती दुबार 9500-1000, बासमती तिबार 10000-10500, बासमती मोगरा 5500-6500, बासमती कणी 4000-4500, 1509-8500-9500, इंद्रायणी 5500-6000 रु. गहू - लोकवन नं. 1 4000-4200, लोकवन नं. 2 3600-40020, नं.3 3300-3600, सिहोर नं. 1 5700- 6000, सिहोरी 3800-4400, मिलबर 3100 रु. ज्वारी :- गावरान नं. 1 5700-6200, गावरान नं.2 5200-5500, नं.3 4700-5100, दूरी नं.1 3800-4000, दूरी नं. 2 3500-3700 रु बाजरी:- महिको नं.1 4000-4200, महिको नं.2 3600-3800, गावरान 3300-3500, हायब्रीड 3200-3300 रु. गूळ :- गूळ एक्स्ट्रा 4600-4700, गूळ नं. 1 4400-4550, गूळ नं.2 4000-4200 गूळ नं.3 3700-3850, नं. 4 - 3500-3650, चिक्की गूळ (10/30 किलो) 4500-4700, चिक्की गूळ (एक व अर्धा किलो) 4700- 5300 रु.
डाळी:- तूरडाळ 9000-11000, हरभराडाळ 6700-6800, मूगडाळ 9000-10000, मसूरडाळ 7600-7700, मटकीडाळ 8300-8400, उडीदडाळ 9000-10300 रु. कडधान्ये:-हरभरा 6500-6600, हुलगा 4800-5000 चवळी 7000-9500, मसूर 6900-7000, मूग 9000- 9500, मटकी गावरान 12000, मटकी पॉलिश 6800-7000, मटकी गुजरात 6800-7000, मटकी राजस्थान 6800-7000, मटकी सेलम 14700-15500, वाटाणा हिरवा 9000-11500, वाटाणा पांढरा 4400- 4500, काबुली चणा 7500-11000 रु. साबूदाणा :-साबूदाणा नं.1 5000, साबूदाणा नं.2 4750, साबूदाणा नं.3 4500 रु. वरई भगर :-9500-10500, सावा भगर 9000-9500 रु गोटा खोबरे 3200-3400 रु. शेंगदाणा :- जाडा 9500-10000, स्पॅनिश10500-11000, घुंगरु 10000 टीजे 95000 रु. धने :- गावरान 9000-11000, इंदूर 13000-15000 रु. पोहे :- मध्य प्रदेश 4600-4900,पेण 4600-4800, मध्यम पोहा 4600-4800, दगडी पोहा 4800-5100, पातळ पांहा 5200-5800, सुपर पोहा 5200-5800, भाजका पोहा 650-750, मका पोहा 5500-650, भाजके डाळे 3200-3800, मुरमुरा सुरती (9 किलोस) 560, भडंग 850-1100, घोटी 540 रु. रवा, मैदा, आटा- (50 किलोचा भाव) आटा 1600-1700, रवा 1750-1800, मैदा 1750-1800, बेसन:- (50 किलोस) 4050-4300 रु. मीठ :- मीठ खडे (50किलोस) 300, मीठ दळलेले (50 किलोस) 350 रु. मिरची:-काश्मीरी ढब्बी 35000-40000, ब्याडगी 25000-28000, लवंगी तेजा 17000-18000, गुंटूर 17000-18000, खुडवा गुंटूर 8000-11000, खुडवा ब्याडगी 10000-12000 रु. नारळ :- (शेकडयाचा भाव): नवा पॅकिंग 2000-2300, मद्रास 4500-4800, पालकोल जुना 2400-2600, सापसोल 4000-4500 रु.
शेंगदाणा तेल तेजीत
भुईमूग शेंगाच्या भाववाढीचा परिणाम शेंगदाणा तेलावरही झाला असून, गेल्या आठवड्यात दरात 15 किलोच्या डब्यामागे 20 ते 25 रुपयांनी वाढ झाली. मागणी साधारण असल्याने अन्य सर्व खाद्यतेल, वनस्पती तूप आणि खोबरेल तेलाचे दर स्थिर होते. संक्रांतीचा सण जवळ आल्याने चिकी गुळाची उलाढाल वाढली आहे. आवक मुबलक असल्याने हलक्या गुळाच्या दरातील मंदी कायम आहे. आवक-जावक साधारण असल्याने साखरेचे दरही मंदीतच होते.