Pune Fruit Vegetable Market: पुणे मार्केट यार्डात फळभाज्यांची आवक व मागणी वाढ; कांद्याच्या भावात घट

कांदा वगळता सर्व भाज्यांचे दर स्थिर, गुलटेकडी बाजारात आवक वाढल्याने मागणी मजबूत
Onion
OnionPudhari
Published on
Updated on

शंकर कवडे

पुणे: कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डातील तरकारी विभागात फळभाज्यांची आवक मागील आठवड्याच्या तुलनेत वाढली आहे. त्या तुलनेत मागणीही वाढली आहे. त्यामुळे कांदा वगळता सर्व प्रकारच्या फळभाज्यांचे भाव मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर असल्याची माहिती अडतदार निखिल भुजबळ यांनी दिली. दरम्यान, कांद्याची आवक स्थिर असली, तरीही मागणी घटली आहे. त्यामुळे कांद्याच्या भावात घट झाली आहे. घाऊक बाजारात मागील आठवड्यात दर्जानुसार 18 ते 25 रुपये भाव मिळालेल्या कांद्याला आज दर्जानुसार 12 ते 18 रुपये भाव मिळाल्याचे या वेळी सांगण्यात आले.

Onion
Pension Card Fraud: पेन्शनकार्ड काढून देण्याच्या बहाण्याने ज्येष्ठाची 9 लाखांची फसवणूक

घाऊक बाजारात रविवारी (दि. 21) राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून मिळून सुमारे 100 ट्रक फळभाज्यांची आवक झाली. परराज्यातून झालेल्या आवकेमध्ये कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात आणि मध्य प्रदेश येथून हिरवी मिरची सुमारे 20 टेम्पो, कर्नाटक येथून कोबी 4 टेम्पो, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथून शेवगा 3 टेम्पो, राजस्थान येथून गाजर सुमारे 15 टेम्पो, कर्नाटक येथून घेवडा 5 टेम्पो, कर्नाटक येथून भुईमूग 2 टेम्पो, मध्य प्रदेश येथून मटार 50 टेम्पो, कर्नाटक येथून पावटा 3 टेम्पो, तामिळनाडू येथून तोतापुरी कैरी 300 क्रेट्स, मध्य प्रदेश येथून लसणाची सुमारे 10 टेम्पो तर इंदूर, आग्रा, स्थानिक भागातून मिळून बटाट्याची 60 टेम्पो आवक झाली.

Onion
Dr. Baba Adhav: डॉ. बाबा आढाव यांच्या स्मरणार्थ 800 कचरावेचकांची निर्धार सभा

स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे 500 गोणी, भेंडी, कोबी आणि हिरवी मिरची प्रत्येकी सुमारे 7 टेम्पो, गवार 5 टेम्पो, टोमॅटो 10 हजार क्रेट्स, काकडी 5 टेम्पो, फ्लॉवर, ढोबळी मिरची, तांबडा भोपळा प्रत्येकी सुमारे 10 ते 15 टेम्पो, गाजर आणि घेवडा प्रत्येकी 3 टेम्पो, पावटा 5 टेम्पो, कांदा सुमारे 90 टेम्पो आवक झाली.

Onion
Ajit Pawar interviews: अजित पवारांकडून इच्छुकांच्या मॅरेथॉन मुलाखती; एकाच जागेसाठी कार्यकर्ते समोरासमोर

पालेभाज्यांची आवक घटली

मार्केट यार्डात पालेभाज्यांची आवक घटली आहे. त्या तुलनेत मागणी जास्त असल्यामुळे घाऊक बाजारात कांदापात आणि मुळेच्या भावात जुडीमागे अनुक्रमे 5 आणि 3 रुपयांनी वाढ झाली आहे. तर मागणी कमी असल्याने आवक घटूनही कोथिंबिरीच्या भावात जुडीमागे 5 रुपयांनी घट झाली आहे. मागील आठवड्यात दर्जानुसार 10 ते 20 रुपये भाव मिळणाऱ्य कोथिंबिरीच्या जुडीला आज (दि. 21) 8 ते 15 रुपये भाव मिळाला. पुदिनाच्या भावातही जुडीमागे 2 रुपयांनी घट झाली आहे. मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे उर्वरित पालेभाज्यांचे भाव मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहेत.

Onion
FRP payment Maharashtra: राज्यात एफआरपीचे 7 हजार 26 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर

मागील रविवारी (दि. 14) कोथिंबिरीची 1 लाख 90 हजार जुडी आवक झाली होती. यामध्ये घट होऊन आज दीड लाख जुडी आवक झाली. मेथीची आवक मात्र मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहे. 1 लाख जुडी आवक झाली. हरभरा गड्डीचीही आवक सुरू झाली आहे. रविवारी 500 गड्डीची आवक झाली. गड्डीस दर्जानुसार 10 ते 15 रुपये भाव मिळाल्याचे सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news