

पुणे : पेन्शनकार्ड काढून देण्याची बतावणी करीत सायबर चोरट्यांनी सदाशिव पेठेतील ७८ वर्षीय ज्येष्ठाला ९ लाखांचा गंडा घातला आहे.
ही घटना १७ ते १८ डिसेंबरदरम्यान घडली आहे. याप्रकरणी त्या ज्येष्ठाने विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पोलिस निरीक्षक अरुण घोडके तपास करीत आहेत.