

पुणे: पुणे पदवीधर मतदारसंघातील भाजप महायुतीच्या अधिकृत उमेदवार डॉ. स्मिताताई योगेश जाधव यांना आमच्या मनापासून शुभेच्छा आहेत. त्या उच्चशिक्षित उमेदवार असून, समाजाची कामे करण्यात अग्रेसर असल्याने त्यांना आमचा पाठिंबा आहे. अशा भावना बी.एस.एन.एल. (भारत संचार निगम लिमिटेड )च्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या.
डॉ. स्मिताताई योगेश जाधव यांच्या प्रचारार्थ बाजीराव रस्त्यावरील टेलीफोन भवन येथे आयोजित बैठकीत महिला आणि पुरुष पदवीधर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपमहाव्यवस्थापक सुनील सोनवणे यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले की, डॉ. स्मिताताई योगेश जाधव यांचे काम चांगले आहे. त्या स्वतः डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू आहेत. तसेच समाज कार्यातही अग्रेसर आहेत. त्यांच्या जाहीरनाम्यात त्यांनी महिलांसाठी खूप चांगल्या योजना जाहीर केल्या हे पाहून आनंद वाटला.
या वेळी किशोर गवळी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की,आमच्या कार्यलयात पदवीधर मतदार मोठ्या संख्येने आहेत. डॉ. स्मिताताई जाधव यांच्या रूपाने पुणे शहराला प्रथमच उच्चशिक्षित महिला उमेदवार मिळाल्या आहेत. त्यांच्याकडून आम्हाला खूप अपेक्षा आहेत. आमच्या मागण्या आणि समस्या त्यांनी सरकार दरबारी मांडाव्यात, ही अपेक्षा आहे. त्यांना पाठिंबा देत आम्ही सर्वजण शुभेच्छा देतो.
यावेळी सुनील सोनवणे, किशोर गवळी, प्राची मानकर, वर्षा उटीकर, शामा गांधी, मीनाक्षी शितोळे, आरती गोडसे, जगन्नाथ नंदकर, अनिश उपाध्याय, दत्तात्रय कऱ्हे, पी. एस. भोयर, उमेश कडू, मधुकर कामठे, जितेंद्र सदाशिव धनावडे, दिलावर शेख, दिलीप मगर, संतोष धरगुडे, दयानंद शिंदे, किरण जावळे, अभिजित बडके, रोहित दातार, मोहन पाटोळे, अमृता मानकर आदी कर्मचऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
डॉ. स्मिताताई जाधव यांना आयएमएकडून शुभेच्छा
पुणे पदवीधर मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिताताई जाधव यांच्यावर इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) पदाधिकाऱ्यांनी विजयासाठी शुभेच्छा दिल्या. मंगळवारी पदाधिकाऱ्यांनी आयएमएच्या कार्यालयात भेट देऊन चर्चा करण्यात आली. या वेळी आयएमए, पुणेच्या अध्यक्षा डॉ. अलका क्षीरसागर यांनी देखील त्यांच्या कामाचे कौतुक केले. तसेच, इतर पदाधिकाऱ्यांनी वैद्यकीय क्षेत्रातील उच्चशिक्षित तसेच पदवीधर आणि डॉक्टर संघटना, औधष विक्रेत्यांना याबाबत कल्पना देण्यात येईल, असेही आश्वासन दिले. या वेळी आयएमएचे अनेक पदाधिकारी, डॉक्टर आणि कर्मचारी उपस्थित होते.