Pune University Security Guard: पुणे विद्यापीठातील सुरक्षारक्षकाच्या खुनाचे गूढ १४ वर्षांनंतरही कायम

२०१२ मध्ये गोळी झाडून हत्या; अनेक पथके, संशयितांची चौकशी आणि बक्षीस जाहीर करूनही मारेकरी पोलिसांच्या हाती नाही
Crime News
Crime NewsPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात झालेल्या सुरक्षारक्षकाच्या खुनाला तब्बल चौदा वर्षांचा कालावधी लोटला आहे. मात्र, अद्यापही या खुनाचे गूढ कायम आहे. पोलिसांना आत्तापर्यंत या खुनाचा छडा लावता आलेला नाही. दरम्यान, या खुनाचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी विविध पथके नेमली. बक्षिसे जाहीर करण्यात आली. काही संशयितांना ताब्यात देखील घेतले गेले.

Crime News
Maharashtra Warehousing Corporation: उद्घाटनाआधीच वखार महामंडळाचे नवे कार्यालय सुरू; जुन्या इमारतींना कुलूप

मात्र, चौदा वर्षांनंतर देखील पोलिस खुन्यापर्यंत पोहचू शकले नाहीत. दि. २ मे २०१२ रोजी सायंकाळी ७ वाजून ४५ मिनिटांनी विद्यापीठातील सेवकांच्या निवासस्थानाजवळ ही घटना घडली होती. प्रल्हाद लक्ष्मण जोगदंडकर (वय ५४) हे विद्यापीठात सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत होते. घटनेच्या दिवशी ते सहकारी सुरक्षारक्षक बाळासाहेब निकळजे यांच्यासह परिसरात गस्त घालत होते.

Crime News
Maharashtra Schools Smart Attendance: १५ ऑक्टोबरपासून शिक्षकांची ऑनलाइन उपस्थिती अनिवार्य; मुख्याध्यापकांवर जबाबदारी

यादरम्यान, त्यांना एका निर्जन ठिकाणी एक तरुण संशयास्पद रितीने एका महिलेसोबत आढळला. जोगदंडकर यांनी त्यांच्याकडे विचारणा केल्यामुळे त्यांच्यात वाद झाला. संबंधित तरुणाने सुरुवातीला पैसे दिले आणि दुचाकीवरून निघून गेला. मात्र, काही वेळाने तो पुन्हा परतला आणि त्याने आपले पैसे परत मागितले. छातीत गोळी लागल्याने प्रल्हाद जोगदंडकर यांचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी काडतुसे आणि ५०० रुपयांची नोट आढळली होती.

Crime News
Ankush Aher Chairman: राज्य बाजार समिती सहकारी संघाच्या सभापतिपदी भाजपचे अंकुश आहेर बिनविरोध

२८ नोव्हेंबर २०१३ रोजी पोलिसांनी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्‍या खून प्रकरणात सुरुवातीला ज्‍यांची नावे समोर आली होती. त्‍यातील दोन आरोपी मनीष नागोरी, विलास खंडेलवाल यांना अटक केली होती. त्‍याबरोबरच राहुल माळी आणि संतोष बागडे यांनाही संशयावरून अटक केली होती. यामुळे या प्रकरणाचा उलगडा होण्याची चिन्हे निर्माण झाली होती; परंतु चौकशीत चौघांचाही खुनाशी संबंध असल्याचे निष्पन्‍न झाले.

Crime News
Drought Affected Students Exam Fee Waiver: दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ; शैक्षणिक संस्थांना शुल्क न घेण्याचे निर्देश

प्रत्यक्षदर्शीचा जबाब आणि ‘अंजू’ नावाच्या महिलेचा शोध

या प्रकरणातील एकमेव प्रमुख प्रत्यक्षदर्शी सहकारी सुरक्षा रक्षक बाळासाहेब निकळजे हे होते. त्यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, संशयित तरुणासोबत असलेल्या महिलेचे नाव ‘अंजू’ असल्याचे समोर आले होते. मात्र, त्या महिलेचे वर्णन अस्पष्ट असल्याने तिची ओळख पटवणे पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरले. परिसरातील संबंधित नावाच्या अनेक महिलांची चौकशी करूनही तिच्यापर्यंत पोहोचण्यात यश आले नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news