GMRT Telescope Discovery: पुण्याच्या GMRT दुर्बिणीतून ८ ते ९ अब्ज वर्षांपूर्वीच्या आकाशगंगांचा रेडिओ सिग्नल शोधला

विश्वाच्या सुरुवातीच्या काळातील अणू हायड्रोजनचा अभ्यास; सुमारे १० हजार आकाशगंगांच्या संकेतांचे २०० तासांहून अधिक निरीक्षण
Ancient Galaxies Discovery
Ancient Galaxies DiscoveryPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: भारतीय खगोलशास्त्रज्ञांच्या चमूने पुण्याजवळील जायंट मीटर्ड रेडिओ टेलिस्कोप (जीएमआरटी) वापरून ८ ते ९ अब्ज वर्षांपूर्वीच्या आकाशगंगांमधून उत्सर्जित झालेल्या अणू हायड्रोजनचा रेडिओ सिग्नल (एचआय २१) शोधला आहे.

Ancient Galaxies Discovery
Pune University Security Guard: पुणे विद्यापीठातील सुरक्षारक्षकाच्या खुनाचे गूढ १४ वर्षांनंतरही कायम

जीएमआरटी ही एक जागतिक दर्जाची रेडिओ दुर्बीण आहे. जी अणुऊर्जा विभागाच्या अंतर्गत असलेल्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रीसर्च (टीआयएफआर) या संस्थेचा एक विभाग असलेल्या नॅशनल सेंटर फॉर रेडिओ एस्टेरिझम (एनसीआरए) द्वारे चालवली जाते.

Ancient Galaxies Discovery
Maharashtra Warehousing Corporation: उद्घाटनाआधीच वखार महामंडळाचे नवे कार्यालय सुरू; जुन्या इमारतींना कुलूप

आपल्या आकाशगंगेतील तारे (‘मिल्की वे) आण्विक हायड्रोजनपासून तयार होतात. हा हायड्रोजन अणू हायड्रोजनपासून तयार होतो. खगोलशास्त्रातील एक महत्त्वाचा अनुत्तरित प्रश्न हा आहे की, या सुरुवातीच्या आकाशगंगांमध्ये न्यूक्लियर हायड्राइडचे प्रमाण काळानुसार कसे बदलले? विशेषतः वैश्विक कालक्रमातील काळ सुमारे ८ ते १० अब्ज वर्षांपूर्वीचा होता, जेव्हा विश्वातील तारानिर्मितीची क्रिया शिखरावर होती. त्यातही आठ अब्ज वर्षांपूर्वीच्या विश्वातील तारानिर्मितीची क्रिया इतकी झपाट्याने का कमी झाली?

Ancient Galaxies Discovery
Maharashtra Schools Smart Attendance: १५ ऑक्टोबरपासून शिक्षकांची ऑनलाइन उपस्थिती अनिवार्य; मुख्याध्यापकांवर जबाबदारी

नेमके काय आहे संशोधन

  • आकाशगंगेतील अणू हायड्रोजनचे प्रमाण सुमारे २१ से.मी. तरंगलांबीवर उत्सर्जित होणाऱ्या रेडिओ सिग्नलचे मापन करून अभ्यासता येते, हेच दाखवून दिले.

  • या सिग्नलला ‘एचआय २१ सेमी सिग्नल’ म्हणून ओळखले जाते. रेडिओ दुर्बिणी वापरून आकाशगंगांमध्ये तो शोधला.

  • आठ अब्ज वर्षांपूर्वीच्या तरुण विश्वातील आकाशगंगांमधील अणू हायड्रोजनचे प्रमाण मोजण्यासाठी दूरच्या आकाशगंगांमधून येणारे एचआय २१ से.मी. सिग्नल पकडावे लागले.

  • या आकाशगंगांमधून येणारे सिग्नल आपल्यापर्यंत पोहोचायला अब्जावधी वर्षे लागत असल्यामुळे आपण या आकाशगंगा अब्जावधी वर्षांपूर्वी जशा होत्या तशाच दिसत आहेत.

  • संशोधकांनी जीएमआरटीचा वापर करून ‘कॉसमॉस फिल्ड’ नावाच्या आकाशातील एका भागाचे २०० तासांहून अधिक काळ निरीक्षण केले. त्यानंतर सुमारे १० हजार आकाशगंगांमधील एचआय २१ सेमी संकेतांना आरेखित करून त्यांची सरासरी काढली.

Ancient Galaxies Discovery
Ankush Aher Chairman: राज्य बाजार समिती सहकारी संघाच्या सभापतिपदी भाजपचे अंकुश आहेर बिनविरोध

विश्वातील आकाशगंगांमधून येणाऱ्या सरासरी हाय २१ सीएम. या सिग्नलचा हा शोध या वयाच्या प्रत्येक आकाशगंगेमधून येणारा सिग्नल मोजण्याच्या ध्येयाच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे, जे यापूर्वी कधीही केले गेले नव्हते.

प्रा. विसम काणेकर, संशोधक, एनसीआरए, पुणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news