Pune Ganeshotsav AI: गणेशोत्सवाच्या देखाव्यांत ‘AI’चा जलवा; रोबोटशी संवाद अन्‌ स्मार्ट शेतीचा अनुभव

पुण्यातील गणेश मंडळांकडून आधुनिक तंत्रज्ञानाची झलक; संरक्षण, कृषी, आरोग्य अन्‌ अंतराळातील AI वापर उलगडणार
Ganeshotsav AI
Ganeshotsav AIPudhari
Published on
Updated on

सुवर्णा चव्‍हाण

पुणे: एका रोबोटने आपल्याशी संवाद साधला तर... संरक्षण अन्‌ कृषी क्षेत्रात एआयचा वापर कसा केला जातोय, हे आपल्याला कळाले तर... एआयची दुनिया काय आहे, हे समजले तर... हो, हे सगळे गणेशभक्तांना चक्क मंडळांच्या देखाव्यांमधून समजणार आहे.

Ganeshotsav AI
Guava Price Increase: श्रावणात पेरू महागला! मागणी वाढली, आवक घटली; शेतकऱ्यांना दिलासा

काळानुरूप बदलत आता श्रीगणेश मंडळेही वेगळ्या विषयांवर देखावे सादर करीत असून, यंदाच्या गणेशोत्सवात काही मंडळे आधुनिक तंत्रज्ञान अन्‌ कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) यावर आधारित देखावे साकारत आहेत. एआयचा प्रत्यक्ष वापर दाखविणाऱ्या वर्किंग मॉडेल्सपासून रोबोटशी संवाद, स्मार्ट शेती आणि संरक्षण क्षेत्रातील तंत्रज्ञानापर्यंतच्या संकल्पना या देखाव्यांतून उलगडणार आहेत. सध्या मंडळांच्या कार्यकर्त्यांकडून देखाव्यांच्या तयारीला वेग आला आहे.

Ganeshotsav AI
Flower Prices Fall: गणेशोत्सवातही फूल उत्पादकांची निराशा! जुन्नरमध्ये झेंडू १० ते १५ रुपये किलो

सध्याचे युग हे आधुनिक तंत्रज्ञानाचे असून, एआयने जवळपास प्रत्येक क्षेत्रात प्रवेश केला आहे. त्याच पार्श्वभूमीवर शहरासह उपनगरांतील गणेश मंडळांच्या देखाव्यांनाही तंत्रज्ञानाची जोड मिळाली आहे. काही मंडळे एआय हा विषयच देखाव्याचा केंद्रबिंदू बनवत आहेत, तर काही मंडळांकडून देखावे साकारतानाच एआयचा वापर केला जात आहे. एआयच्या माध्यमातून छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य डिजिटल साहित्य तयार करून सजावटीला आधुनिक रूप दिले जात आहे. मंडळातील कार्यकर्ते या विषयाचा अभ्यास करून संकल्पना प्रत्यक्षात आणत आहेत.

Ganeshotsav AI
Saswad Bribery Case: ती २५ हजारांची लाच नेमकी कोणासाठी? 'जनसेवे'च्या नावाखाली दलालीचा बाजार? 'त्या' अधिकाऱ्याचे नाव अद्याप गुलदस्त्यात

मंडळाकडून नवकल्पनांचा प्रवास मांडण्याचा प्रयत्न

येरवडा येथील नवज्योत मित्रमंडळाकडून 'जय जवान, जय किसान, जय विज्ञान आणि जय अनुसंधान' या संकल्पनेवर आधारित देखावा साकारण्यात येत आहे. एआय आणि रोबोटिक्सचा प्रत्यक्ष वापर वर्किंग मॉडेल्सच्या माध्यमातून दाखविला जाणार आहे. याविषयी मंडळाचे अध्यक्ष अमित जाधव म्हणाले, 'एआय आणि रोबोटिक्सची माहिती देणारा तसेच नागरिकांशी संवाद साधणारा रोबोट हे प्रमुख आकर्षण असेल. नागरिकांनी एआय आणि रोबोटिक्ससंदर्भातील प्रश्न विचारल्यास रोबोट त्यांना उत्तरे देईल. त्यामुळे विद्यार्थी आणि लहान मुलांना तंत्रज्ञानाची माहिती मनोरंजक पद्धतीने मिळेल. संरक्षण आणि कृषी क्षेत्रातील एआयचा वापरही प्रत्यक्ष मॉडेलमधून दाखविण्यात येणार आहे. आधुनिक भारतातील संशोधन, तंत्रज्ञान आणि नवकल्पनांचा प्रवास मांडण्याचा मंडळाचा प्रयत्न आहे.'

Ganeshotsav AI
Khadakwasla Dam Water Storage: क्षमतेच्या ९० टक्के पाणी सोडूनही खडकवासला साखळी ओव्हरफ्लो

'इंडस्ट्री टू इनफिनिटी विथ एआय'चा प्रवास

हडपसर येथील उषःकाल मित्रमंडळाकडून 'इंडस्ट्री टू इनफिनिटी विथ एआय' संकल्पनेवर आधारित देखावा साकारला जात आहे. स्थिर आणि हलता देखावा, लाइटशो, चित्रे, भित्तिचित्रे, रोबोटिक्स आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर यात करण्यात येत आहे. मंडळाचे सदस्य अनुज भुजबळ म्हणाले की, शेती, आरोग्य, शिक्षण, उद्योग, वाहतूक, अंतराळ संशोधन आणि स्मार्ट सिटीतील एआय व रोबोटिक्सचे बदल देखाव्यातून मांडले जाणार आहेत. या सजावटीसाठी व्यावसायिक कलाकारांची मदत घेण्यात आलेली नाही. चार वर्षांच्या लहान मुलापासून ८५ वर्षांच्या आजोबांपर्यंत मंडळातील सदस्य स्वतः सजावट साकारत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news