Baramati Loan Fraud Case: बचत गटाच्या कर्जासह ‘लाडकी बहीण’ची रक्कम परस्पर काढली; बारामतीत पती-पत्नीवर गुन्हा

महिलेच्या नावावर ४० हजारांचे कर्ज काढून ५८ हजार ५०० रुपये लंपास केल्याचा आरोप; एटीएम कार्डचा परस्पर वापर
money
moneyPudhari
Published on
Updated on

बारामती: बचत गटाच्या कर्ज प्रक्रियेतून महिलेच्या नावावर कर्ज काढून या रकमेसह ‘लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत जमा झालेली ५८ हजार ५०० रुपयांची रक्कम परस्पर काढून घेत अपहार केल्याप्रकरणी पती-पत्नीविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युवराज भारत भोसले व शीतल युवराज भोसले (रा. निरावागज, ता. बारामती) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अक्षय नंदकुमार निंबाळकर (रा. बारामती) यांनी फिर्याद दिली. जुलै २०२४ ते २२ ऑगस्ट २०२६ या कालावधीत हा प्रकार घडला.

money
Baramati Fake Will Case: बनावट मृत्युपत्राने जमीन हडपण्याचा प्रयत्न; बारामतीत पाच जणांवर गुन्हा

दोन वर्षांपूर्वी त्यांचे नातेवाईक मल्हारी अंकुश शिंदे यांच्या माध्यमातून युवराज भोसले व त्यांच्या पत्नीशी ओळख झाली होती. भोसले दाम्पत्य हे सामुदायिक महिला बचत गटाचे संयुक्त अध्यक्ष असल्याचे सांगण्यात आले होते. त्यांच्याकडे फिर्यादीची आई अलका निंबाळकर या सदस्या झाल्या. जुलै २०२४ मध्ये मल्हारी शिंदे यांच्यासाठी तक्रारदाराच्या आईच्या नावावर बचत गटातून ४० हजार रुपयांचे कर्ज काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यासाठी आईची आवश्यक कागदपत्रे भोसले दाम्पत्याकडे देण्यात आली होती. कर्जप्रक्रिया व बँकेचे व्यवहार आपण पाहणार असल्याचे त्यांनी सांगितले होते.

money
Baramati Cotton Cultivation: बारामतीच्या ऊसपट्ट्यात ‘पांढरे सोने’ फुलले; या कारणामुळे वाढतोय शेतकऱ्यांचा कल

दरम्यान, कर्ज मंजूर झाले नसल्याचे भोसले दाम्पत्याकडून सांगण्यात आले. मात्र, सप्टेंबर २०२५ मध्ये ए. यू. स्माॅल फायनान्स बॅंक, फलटण या शाखेकडून फिर्यादीच्या आईला बचत गटाच्या कर्जाचे हप्ते थकीत असल्याचा फोन आला. त्यानंतर बँकेत चौकशी केली असता, १ सप्टेंबर २०२४ रोजी आईच्या नावावर ४० हजार रुपयांचे कर्ज मंजूर होऊन ते त्यांच्या खात्यात जमा झाल्याचे समोर आले.

money
Pune District Cooperative Bank Election: पुणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे बिगुल; मतदान प्रतिनिधी निवडले, आता मतांचे गणित

कर्जाची प्रक्रिया करताना फिर्यादीच्या आईच्या खात्याचे एटीएम कार्डही भोसले दाम्पत्याने परस्पर घेतले. त्याद्वारे बारामतीतील विविध एटीएमस सेंटरमधून रोख रक्कम काढण्यात आली तसेच काही ठिकाणी कार्ड स्वॅप करून व्यवहार करण्यात आले. बचत गटातून वितरित झालेल्या ३८ हजार ५०० रुपये आणि ‘लाडकी बहीण’ योजनेतून खात्यात जमा झालेल्या अंदाजे २० हजार रुपये अशी एकूण सुमारे ५८ हजार ५०० रुपयांची रक्कम खात्यातून काढण्यात आले.

money
Pune District Rain: पावसाने पुणे जिल्ह्यात पुन्हा हजेरी; खरीप पिकांना दिलासा, शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित

या रकमेबाबत भोसले दाम्पत्याकडे विचारणा केली असता त्यांनी चूक मान्य करून पैसे परत देण्याचे आश्वासन दिले; मात्र, त्यानंतर रक्कम देण्यात टाळाटाळ केली. पैसे मागण्यासाठी संपर्क साधल्यानंतर शिवीगाळ व दमदाटी करून खोटा अ‍ॅट्रॉसिटी अथवा विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news