Pune Farmer Debt Relief: पुणे जिल्ह्यात ५७ हजार शेतकरी कर्जमुक्त; पीडीसीसी बँकेला ४९६ कोटींची कर्जमाफी

अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा तिसऱ्या टप्प्याअखेर लाभ; कर्जमुक्त शेतकरी आता नवीन पीक कर्जासाठी पात्र
Pune District Cooperative Bank
Pune District Cooperative BankPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत तिसऱ्या टप्प्याअखेर पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेंतील (पीडीसीसी बँक) ५७ हजार ४७५ खातेदार शेतकऱ्यांना थकीत बँक कर्ज खात्यावर संबंधित कर्जापोटीची सुमारे ४९६ कोटी २ लाख रुपयांइतकी कर्जमुक्तीची रक्कम बँक खात्यावर जमा झालेली आहे. त्यामुळे असे कर्जमुक्त झालेल्या संबंधित खातेदार शेतकरी आता शासनाच्या योजनेअन्वये नवीन पीक कर्ज घेण्यास प्राप्त झालेले आहेत. शिवाय, जिल्हा बँकेची थकीत कर्जाची रक्कमही वसूल झाल्यामुळे बँकेलाही योजनेचा फायदाच झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

Pune District Cooperative Bank
Baramati Heat: पश्चिम बारामतीत ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच उन्हाचा तडाखा; पाणीटंचाईची चिंता वाढली

जिल्हा बँकेकडून शेतकऱ्यांना खरिपाबरोबरच रब्बी हंगामातही पीक कर्जाचे वितरण विकास सोसायट्यांमार्फत करण्यात येते. तसेच, शासनाच्या कृषी विभागाच्या योजनांसाठी शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वितरण करण्यात येते. राज्य सरकारच्या कर्जमुक्तीच्या योजनेच्या घोषणेनंतर जिल्हा बँकांकडून संबंधित शेतकऱ्यांची यादी माहितीसह संबंधित पोर्टलवर अपलोड करण्यात आली होती.

Pune District Cooperative Bank
Ambegaon Leopard Attack: आंबेगावात पोल्ट्री फार्मवर बिबट्याचा हल्ला; ३०० कोंबड्या ठार, ४५ हजारांचे नुकसान

प्रत्यक्षात आधार प्रमाणीकरणासाठी तिसऱ्या यादीअखेर ६५ हजार ६२८ शेतकऱ्यांची नांवे यादीत आली. त्यापैकी सुमारे ५९ हजार २४७ शेतकऱ्यांनी आपले आधार प्रमाणीकरण पूर्ण केले. आधार प्रमाणीकरण अपूर्ण असलेल्या शेतकऱ्यांची संख्या ६ हजार ३८१ असून, ते पूर्ण करण्याबाबतच्या सूचना क्षेत्रीय अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. प्रत्यक्षात कर्जमुक्तीची रक्कम प्राप्त शेतकरी कर्जखात्यांची संख्या ५७ हजार ४७५ असून, कर्जमुक्तीची रक्कम ४९६ कोटी २ लाख रुपये असल्याची माहिती बँक अधिकाऱ्यांनी दिली.

Pune District Cooperative Bank
Maharashtra Sports Policy: महाराष्ट्राच्या नव्या क्रीडा धोरणावर प्रश्नचिन्ह; बक्षिसांपेक्षा खेळाडू घडविण्याची व्यवस्था मजबूत करण्याची गरज

जिल्ह्यात दौंड, इंदापूरच्या शेतकऱ्यांची सर्वाधिक रक्कम

जिल्ह्यात कर्जमुक्ती योजनेचा सर्वाधिक लाभ तिसऱ्या यादीअखेर दौंडमध्ये १२१.२९ कोटी आणि त्या खालोखाल इंदापूरमधील १११.०५ कोटी इतकी सर्वाधिक रक्कम प्राप्त झालेली आहे. अन्य तालुक्यांमध्ये (आकडे कोटी रुपयांत) आंबेगाव ९.७९, बारामती ८३.९४, भोर २१.१४, हवेली १६.६१, जुन्नर १९.०७, खेड १६.४६, मावळ ९.७५, मुळशी ३.१९, पुरंदर २९.२७, शिरूर ५१.०३, वेल्हा ३.४३ कोटी रुपयांचा समावेश आहे.

Pune District Cooperative Bank
Pune Crime: पुण्यात किरकोळ वादातून मित्राचा पेव्हर ब्लॉकने खून; आरोपी तीन तासांत अटकेत

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत जिल्हा बँकेंस थकीत कर्जापोटी ४९६ कोटी रुपये प्राप्त होऊन संबंधित शेतकऱ्यांची खाती कर्जमुक्त झाली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना योजनेचा फायदा होऊन बँकेंची थकीत कर्जाची वसुलीही होण्यास मदत झाली आहे. अशा पात्र शेतकऱ्यांना पुढील पीक कर्जवाटप करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शासन योजनेत बँकेंकडून भरण्यात आलेल्या थकीत कर्जखात्यांच्या ऑनलाइन माहितीनुसार आणि प्रत्यक्षात प्राप्त रक्कम पाहता अजूनही पीडीसीसी बँकेंची थकीत दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जखात्यांमधील १७५ कोटी रुपयांइतकी कर्जमुक्तीची रक्कम योजनेतून प्राप्त होणे बाकी आहे.

प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, अध्यक्ष, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, पुणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news