

पुणे: राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर राजकीय वातावरण तापू लागले आहे. यामध्ये पुणे महापालिकेचाही समावेश असल्याने शहरासह ग््राामीण भागातील राजकारणाला वेग आला आहे. आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकाच शिल्लक राहिल्या असून, जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांसह मतदारांचेही लक्ष या निवडणुकांकडे लागले आहे. त्यामुळेच ग््राामीण भागात इच्छुकांकडून देवदर्शन, कोकणदर्शन, सहली आणि सामाजिक कार्यक्रमांचा सपाटा सुरू झाला आहे.
सध्या पुणे जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग््रेासची सत्ता आहे. हा पक्ष सध्या महायुतीचा घटक असला, तरी जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग््रेास, भाजप आणि शिवसेना यांची महायुती होण्याची शक्यता अत्यंत कमी मानली जात आहे. स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणे, नेतृत्वाची स्पर्धा आणि कार्यकर्त्यांचा दबाव पाहता प्रत्येक पक्ष स्वबळावर निवडणूक लढविण्याची तयारी करीत असल्याचे चित्र आहे.
दुसरीकडे, महाविकास आघाडीतील घटकपक्षांतही फारसे सख्य दिसून येत नाही. काँग््रेास, राष्ट्रवादी काँग््रेास शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना (उबाठा) यांच्यात स्थानिक जागावाटप आणि नेतृत्वावरून मतभेद असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या आघाडीतही स्वतंत्र लढतींची शक्यता नाकारता येत नाही.
एकूणच, महापालिका निवडणुकांच्या घोषणेनंतर पुणे जिल्हा परिषद निवडणूक ही प्रतिष्ठेची आणि अटीतटीची होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. इच्छुकांनी आत्तापासूनच प्रचाराची अनौपचारिक यंत्रणा सुरू केली असून, मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध मार्गांचा अवलंब केला जात आहे. आगामी काळात जिल्ह्यातील राजकीय हालचाली आणखी वाढण्याची शक्यता आहे.
जि. प. निवडणुकीतील महत्त्वाचे मुद्दे
सध्या सत्ताधारी : राष्ट्रवादी काँग््रेास
संभाव्य लढत : बहुतांश पक्ष स्वबळावर
प्रचाराची दिशा : देवदर्शन, सहली, सामाजिक कार्यक्रम
आघाड्यांचे चित्र : महायुती व महाविकास आघाडीत स्थानिक मतभेद
मतदारांचा कल : विकास, स्थानिक नेतृत्व आणि प्रभावी उमेदवारांकडे लक्ष