Rajgad Kadve Cliff Rescue: राजगड तालुक्यातील कादवे गावात तरुण कड्यावर अडकला; रात्रभरानंतर सुखरूप बचाव

मदतीसाठी दिलेल्या आवाजामुळे सकाळी स्थानिकांच्या लक्षात घटना; पोलिस व आपत्ती व्यवस्थापनाची तत्पर कारवाई
Kadve Cliff Rescue
Kadve Cliff RescuePudhari
Published on
Updated on

खडकवासला: राजगड तालुक्याच्या कादवे गावातील डोंगरावर फिरण्यासाठी गेलेला 21 वर्षीय तरुण रात्री कड्याच्या मध्यभागी अडकला. रात्रभर मदतीसाठी ओरडल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी स्थानिकांनी त्याचा आवाज ऐकला. तातडीने वेल्हा पोलिसांना माहिती मिळताच बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेऊन त्या तरुणाला कड्याच्या धोकादायक भागातून सुखरूप बाहेर काढले.

Kadve Cliff Rescue
Rajdandadhishthit Shivaji Maharaj Statue: धायरीत राजदंडाधिष्ठित छत्रपती शिवाजी महाराजांच्या १८ फूट पुतळ्याचे अनावरण

मिळालेल्या माहितीनुसार, दीपेश वर्मा (वय 21, रा. कुशीनगर, उत्तर प्रदेश) हा तरुण रात्री कादवे परिसरातील डोंगरावर फिरण्यासाठी गेला होता. अंधार पडल्यामुळे त्याला पुढील मार्ग दिसत नव्हता. अचानक तो डोंगरावरील एका कड्याच्या मध्यभागी अडकला. समोर वर चढायला मार्ग नव्हता आणि खाली खोल दरी असल्यामुळे त्याची मोठी कोंडी झाली. आपण धोकादायक स्थितीत अडकलो आहोत, हे लक्षात येताच त्याने ‌‘वाचवा वाचवा‌’ म्हणून आवाज देण्यास सुरुवात केली. मात्र, रात्रीची वेळ, डोंगराळ आणि जंगली भाग असल्यामुळे त्याचा आवाज कोणापर्यंत पोहोचला नाही. त्यामुळे दीपेशने त्याच कड्यामध्ये मदतीच्या प्रतीक्षेत रात्र काढली.

Kadve Cliff Rescue
Resident Doctors Safety Crisis: राज्यातील निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न; 5800 डॉक्टर असुरक्षित

दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास याच परिसरात असलेले स्थानिक नागरिक राहुल ठाकर यांनी ‌‘बचाव बचाव‌’ असा आवाज ऐकला. आवाजाच्या दिशेने लक्ष केंद्रित केल्यावर डोंगराच्या कड्यामध्ये कोणीतरी अडकल्याची त्यांना खात्री झाली. ठाकर यांनी कोणताही विलंब न लावता तातडीने वेल्हा पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक किशोर शेवते यांना या घटनेची माहिती दिली. शेवते यांनी याची दखल घेत कादवे गावाचे पोलिस पाटील भाऊसाहेब ढेबे यांना तसेच आपत्ती व्यवस्थापन पथकाशी त्वरित संपर्क साधला.

Kadve Cliff Rescue
Pune Municipal Election Process: पुणे महापालिका निवडणूक प्रक्रियेला सुरुवात; 41 प्रभागांसाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती

माहिती मिळताच, आपत्ती व्यवस्थापनचे सदस्य उत्तम पिसाळ, अक्षय जागडे, वैभव जागडे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांना स्थानिक नागरिक राहुल ठाकर, दत्ता जागडे, संजय चोरघे, वैभव भोसले आणि पोलिस पाटील तानाजी भोसले यांची मोलाची साथ दिली.

Kadve Cliff Rescue
Sugar MSP Increase Demand: ऊस एफआरपी थकबाकी 1.30 लाख कोटींच्या पुढे; साखरेचा एमएसपी 41 रुपयांपर्यंत वाढवण्याची मागणी

बचाव पथकाने तत्परतेने नियोजन करून धोकादायक कड्यामध्ये अडकलेल्या दीपेश वर्मापर्यंत पोहोचण्याचा मार्ग शोधला. शर्थीचे प्रयत्न करत योग्य साधनांचा वापर करून त्याला कड्याच्या मध्यभागातून सुखरूपपणे बाहेर काढले. जीव वाचल्याने दीपेश वर्मा याने सुटकेचा निःश्वास सोडला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news