

पुणे : पुढारी वृत्तसेवा
69 व्या पुरुष व महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धेसाठी पुणे जिल्ह्याचा कबड्डी संघ जाहीर झाला असून, पुरुष संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी गोकुळ तोडकरवर, तर महिला संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी ऋतिका होनमाने हिच्याकडे सोपविण्यात आली आहे.
या स्पर्धेसाठी पुरुष संघाचे प्रशिक्षक विलास नाईक व संघव्यवस्थापक अनिल यादव आहेत. महिला संघाचे प्रशिक्षक म्हणून योगेश यादव व व्यवस्थापिका म्हणून कांचन चुनेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुरुषांचा संघ राजेंद्र देशमुख, दत्तात्रय कळमकर व प्रकाश पवार यांनी, तर महिलांचा संघ शकुंतला खटावकर, नीलेश लोखंडे आणि शीतल मारणे (जाधव) यांच्या निवड समितीने निवडला आहे, अशी माहिती पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सरकार्यवाह मधुकर नलावडे यांनी दिली.
पुरुष : गोकुळ तोडकर (संघनायक), गणेश कांबळे, सचिन पाटील, विनीत कालेकर, कृष्णा शिंदे, तन्मय चव्हाण, ऋतिक जाधव, शुभम पाटील, अजित चव्हाण, प्रथमेश निघोट, अक्षय बोडके, सोमनाथ लोखंडे.
महिला : ऋतिका होनमाने (संघनायक), अंकिता जगताप, सायली केरीपाळे, स्नेहल शिंदे, पूजा शेलार, दिव्या गोगावले, स्वप्नाली पासलकर, मानसी रोडे, सिद्धी मराठे, निकिता पडवळ, सिद्धी बलकवडे, साक्षी काळे.