Udayanraje Bhosale : राज्यपालांनी आपले वक्तव्य त्वरित मागे घ्यावे : उदयनराजे
पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रमाता जिजाऊ या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरु होत्या. तरीही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रामदास हे महाराजांचे गुरू होते, असे वक्तव्य करून शिवप्रेमीसह संपूर्ण महाराष्ट्राच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे राज्यपालांनी आपले वक्तव्य त्वरित मागे घ्यावे, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी केली आहे.
औरंगाबाद येथे बोलताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वक्तव्य करून नवा वादाला तोंड फोडले आहे. रामदास स्वामी यांच्याशिवाय शिवाजी महाराज यांना कोण विचारेल, असे वादग्रस्त वक्तव्य राज्यपाल यांनी केले आहे. आता यावर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. तर शिवप्रेमींतून संताप व्यक्त केला जात आहे. उदयनराजे (Udayanraje Bhosale) यांनीही ट्विट करत राज्यपाल यांच्या विधानाचा समाचार घेत निशाणा साधला आहे.
हेही वाचलंत का ?
पहा व्हिडिओ

