Pune District Cricket Association Controversy: पुणे जिल्हा क्रिकेट असोसिएशन सभेत वॉकआऊट; एजीएम वादात

सभेच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह; निवडणुकांबाबत अनिश्चितता कायम
Cricket
CricketPudhari
Published on
Updated on

सुनील जगताप

पुणे: पुणे जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित केली होती. या सभेमध्ये काही सदस्यांनी वॉकआऊट करीत सभाच नियमबाह्य असल्याचे नोटिशीद्वारे कळविले आहे. दरम्यान, असोसिएशनची ही सभा वादग््रास्त ठरली असून, संघटनेची पुढील दिशा नक्की काय आहे याचा उलगडा मात्र झालेला नाही.

Cricket
Purandar Airport Land Acquisition: पुरंदर विमानतळ प्रकल्पाला वेग; जमीन संपादनासाठी MIDC निधी लवकरच

या सभेबाबत ‌‘पीडीसीए‌’च्या काही सदस्यांनी कायदेशीर नोटिशीद्वारे सभेला जोरदार विरोध दर्शविला. संबंधित पदाधिकाऱ्यांची नियुक्ती 2022 ते 2025 या कालावधीसाठी होती. हा कार्यकाळ संपलेला असून, अद्याप नवीन निवडणुका झालेल्या नाहीत, त्यामुळे त्यांना सभा बोलावण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार नसल्याचे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Cricket
Pune Ola Uber Overcharging: ॲपपेक्षा जास्त भाडे आकारण्याचा प्रकार; ओला-उबेर चालकांविरोधात प्रवाशांचा संताप

‌‘पीडीसीए‌’ची सर्वसाधरण सभेमध्ये मुख्य विषय हा निवडणूक घेण्याबाबतचा होता. मात्र, या सभेमध्ये पुढे काय झाले, याबाबत माहिती गुलदस्त्यात आहे. यासदंर्भात ‌‘पीडीसीए‌’चे कार्याध्यक्ष यांनी सभेमध्ये झालेल्या विषयाबाबत माहिती पाठवतो, असे सांगितले मात्र ती माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. त्यामुळे नक्की या सभेमध्ये कोणते विषय आणि काय निर्णय झाला, याबाबत क्रिकेटपटूंमध्ये चर्चा रंगली आहे.

Cricket
Pune Dog Attack Case: पार्किंग वादातून तरुणावर तीन जर्मन शेफर्ड कुत्र्यांचा हल्ला

विना अधिकार बोलावलेली ही सभा आणि त्यामध्ये घेतलेले निर्णय कायदेशीरदृष्ट्‌‍या शून्य ठरणार आहेत. धर्मादाय आयुक्तांच्या परवानगीशिवाय किंवा रीतसर नवीन कार्यकारिणी निवडल्याशिवाय कोणतीही सभा घेऊ नये, असे पीडीसीएला सभेत सांगण्यात आले असून, या सभेतून दहा सदस्यांनी वॉकआऊट केले.

यशवंत भुजबळ, सदस्य, पुणे जिल्हा क्रिकेट असोसिएशन

Cricket
Pune Lemon Price Drop: उन्हाळ्यातही लिंबाचे दर घसरले; हॉटेल-रेस्टॉरंटची मागणी 40% कमी

‌‘पीडीसीए‌’च्या सर्वसाधारण सभेमध्ये जे दहा सदस्य सभेमधून बाहेर गेले, त्यांना आपल्या अडचणी अथवा म्हणणे मांडण्याची विनंती केली होती. परंतु, त्यांनी याबाबत प्रतिसाद दिला नाही. त्याचबरोबर सह्या न करता ते बाहेर पडले.

विवेक डफळ, कार्याध्यक्ष, पुणे जिल्हा क्रिकेट असोसिएशन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news