Pune Ola Uber Overcharging: ॲपपेक्षा जास्त भाडे आकारण्याचा प्रकार; ओला-उबेर चालकांविरोधात प्रवाशांचा संताप

मीटरप्रमाणे पैसे देण्याचा आग्रह; प्रशासनाने कारवाईची मागणी
Uber
UberPudhari
Published on
Updated on

पुणे: बसचे धक्के खात जाण्यापेक्षा आरामदायी प्रवास व्हावा, यासाठी नागरिकांकडून ओला, उबेरसारख्या वाहनसेवांची सुविधा मोठ्या प्रमाणात वापरली जाते. मात्र, कंपन्यांच्या वाहनचालकांकडून मनमानी पैसे आकारले जात असल्याचे दैनिक ‌‘पुढारी‌’ने केलेल्या पाहणीतून स्पष्ट झाले आहे. ॲपवर दाखविलेल्या भाड्याऐवजी थेट मीटरप्रमाणे पैसे देण्याचा आग््राह वाहन चालकांकडून केल्या जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. आरटीओ आणि पोलीस प्रशासनाने याबाबत तातडीने कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

Uber
Pune Dog Attack Case: पार्किंग वादातून तरुणावर तीन जर्मन शेफर्ड कुत्र्यांचा हल्ला

ॲप्लिकेशनमध्ये दाखवलेली रक्कम आणि प्रत्यक्ष आकारलेली रक्कम यामध्ये बराच फरक पडतो. मीटरप्रमाणे पैसे आकारले जातील, असे पालपूद ऐकवले जाते. प्रवाशांनी याबाबत आक्षेप घेतल्यास काही चालकांकडून उद्धट वर्तन केल्याच्या घटनाही समोर येत आहेत. प्रवाशांनी संबंधित कंपन्यांकडे तक्रारी नोंदवण्यास सुरुवात केली आहे. प्रशासनानेही या प्रकरणाची दखल घेऊन नियमांचे काटेकोर पालन व्हावे, तसेच प्रवाशांना होणारा त्रास थांबवण्यासाठी योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

Uber
Pune Lemon Price Drop: उन्हाळ्यातही लिंबाचे दर घसरले; हॉटेल-रेस्टॉरंटची मागणी 40% कमी

केशवनगर येथील लोणकर चौक येथून चंदननगर येथे जाण्यासाठी उबेर बुक केली. यावेळी, त्यासाठी 94 रुपये सांगण्यात आले. गाडी आल्यानंतर तिला ओटीपी देत आम्ही चंदननगर येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत पोहोचलो. खरेदी उरकल्यानंतर पुन्हा उबेर बुक केली. यावेळी ज्या ठिकाणाचे लोकेशन टाकण्यात आले, त्याठिकाणी गाडी आलीच नाही. कॉल करूनही रिक्षाचालक त्याठिकाणी आला नाही, उलट बुकिंग रद्द केले. त्यानंतर थोडे पुढे जात गाडी पुन्हा एकदा बुक केली. मात्र, बुकिंग करताना रिक्षा पाच मिनिटांत येईल, असे दाखवले. प्रत्यक्षात जवळपास अर्धा तास गेला. रिक्षा आल्यानंतर ओटीपी मागितला, तर मीटरनुसार जाणार असल्याचे सांगितले. त्यामुळे, आमचा अर्धा तास वाया गेल्यानंतरही आम्हाला त्याच रिक्षाने जाण्यावाचून पर्याय राहिला नाही. मात्र, मीटरने 92 रुपये झाले. मुळात सध्याच्या काळात तंत्रज्ञानाचा योग्य वापर होणे आवश्यक असताना कंपन्यांचा सोयीऐवजी गैरसोय करण्याकडेच जास्त कल दिसून येतो.

हिराबाई कवडे, केशवनगर

Uber
Pune Water Crisis: सामाविष्ट 32 गावांची पाण्यासाठी भटकंती; पालिका-विकसकांमध्ये जबाबदारीवरून टोलवाटोलवी

प्रवास : निगडी ते सिंहगड रस्ता, वेळ : रात्री 11 वाजता

ओला कंपनीच्या ॲपवरून महिलेने कॅब बुक केली. ॲपमध्ये 465 रुपये होतील, असे दाखवले गेले. ड्रायव्हरला लोकेशन सांगण्यासाठी फोन केला असता, मीटरप्रमाणे पैसे होतील, असे सांगितले. अव्वाच्या सव्वा पैसे देणार नाही, नियमाप्रमाणे होतील, असे महिलेने त्याच्याकडून कबूल करून घेतले. कॅबमध्ये बसल्यावर चालकाने मोबाईलमधील ॲप्लिकेशनवर मीटर सुरू केला. ‌‘ॲप्लिकेशन ओलाचे अधिकृत आहे का‌’, असे विचारले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. सिंहगड रस्त्याला पोहोचल्यावर कॅबमधून उतरताना 1054 रुपये बिल झाल्याचे त्याने सांगितले. ओलाच्या ॲपपेक्षा दुप्पट पैसे झाल्याबद्दल वादावादी झाली. त्यावेळी ‌‘मॅडम तुमचा पत्ता आता मला माहीत झाला आहे. विनाकारण वाद घालू नका. परिणाम वाईट होतील‌’, अशी धमकीच दिली. रात्रीची वेळ असल्याने महिलेने वाद वाढवला नाही.

Uber
Maintenance Case India: स्पर्धा परीक्षेच्या शिक्षणासाठी पतीने आर्थिक मदत देण्याचे न्यायालयाचे निर्देश

चांदणी चौक परिसरात थांबणारे अनेक रिक्षाचालक मीटरने भाडे आकारण्याऐवजी मोबाईल ॲपद्वारे भाडे आकारताना आढळतात. किंबहुना काहींनी मीटरच्या केबलही काढून टाकल्याचे दिसते. पंधरा दिवसांपूर्वी बावधन ते कोथरूड असा प्रवास करताना हे आढळून आले. त्याबाबत रिक्षाचालकाला विचारले असता, ॲपवरही मीटरइतकेच भाडे होते, त्यामुळे ‌‘आरटीओ‌’नेच त्याला परवानगी दिल्याचे सांगितले. ‌‘आरटीओ‌’मध्ये विचारले असता अशी कोणतीही परवानगी नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

पहाटेची वेळ...

पुणे रेल्वे स्टेशनकडे जायचं होतं, म्हणून ओला ॲप उघडलं. भाडं दाखवलं 180 रुपये. बुक केल्यावर काही मिनिटांत रिक्षा दारात येऊन उभी राहिली. रिक्षात बसताच चालक म्हणाला, ‌‘साहेब, मीटरप्रमाणे पैसे द्यावे लागतील, ॲपवर जे दाखवलंय ते आम्हाला लागू होत नाही.‌’ फक्त 20 मिनिटांत रेल्वे स्टेशन गाठलं. मीटरवर 193 रुपये झाले. ॲपवर 180 आणि मीटरचं 193 फक्त 13 रुपयांचा फरक. मीटरनुसार त्याचे ऑनलाइन पेमेंट केले. रिक्षाचालकाला शांतपणे म्हटलं, ‌‘दादा, 13 रुपये काही फार नाहीत, मला वेळेत आणून सोडले. पण अशा गोष्टींमुळे लोकांना वाटतं, रिक्षाचालक फसवतात. अडवणूक करतात.‌’

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news