Pune Dengue Cases: पुण्यात डेंग्यूचा उद्रेक; रुग्णसंख्या ३,१५४ वर, रक्त आणि प्लेटलेट्सचाही तुटवडा

औंध-बाणेरमध्ये सर्वाधिक २८० रुग्णांची नोंद; खासगी रुग्णालयांना रुग्ण नाकारू नका, महापालिका आयुक्तांचे निर्देश, रक्तपेढ्यांमध्ये मागणी आणि उपलब्धतेत मोठी तफावत
Dengue Cases
Dengue CasesPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: शहरात डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढत असताना रुग्णांना उपचारांसाठी वणवण करावी लागू नये, यासाठी पुणे महापालिका प्रशासनाने खासगी रुग्णालयांना स्पष्ट निर्देश दिले आहेत. खाटांची कमतरता असल्याचे कारण देऊन डेंग्यूच्या रुग्णांना दाखल करण्यास नकार देऊ नका. आर्थिक अडचणींमुळे उपचार रखडणार नाहीत, यासाठी सरकारी आरोग्य योजनांची माहितीही रुग्णांना द्या, असे आदेश महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिले.

Dengue Cases
Maharashtra School Assessment: पहिली ते आठवीच्या मूल्यमापनात मोठे बदल; कला शिक्षणात प्रात्यक्षिकांसह लेखी चाचणीही अनिवार्य

राज्यात यंदा डेंग्यूच्या रुग्णसंख्येत गेल्या वर्षाच्या तुलनेत जवळपास २८ टक्क्यांनी वाढ झाली असून, मृतांचा आकडा दोनवरून ११ वर पोहोचला आहे. राज्यातील महापालिका क्षेत्रांमध्ये पुणे शहरात ३,१५४ रुग्णांची नोंद झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईनंतर पुण्यात सर्वाधिक रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणेपुढील आव्हान वाढले आहे. या पार्श्वभूमीवर आयुक्त राम यांनी खासगी रुग्णालयांना भेट देऊन उपचारव्यवस्थेचा आढावा घेतला.

डेंग्यूच्या संशयित आणि निश्चित रुग्णांची माहिती एकात्मिक आरोग्य माहिती मंचाच्या (आयएचआयपी) पोर्टलवर नोंदविण्याचे निर्देश रुग्णालयांना देण्यात आले आहेत. रुग्णांना वेळेत उपचार मिळण्याबरोबरच संसर्गाच्या स्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी ही माहिती महत्त्वाची ठरणार आहे. रुग्णालयांतील बाह्यरुग्ण विभाग, आंतररुग्ण विभाग आणि रुग्णांच्या नातेवाइकांमध्येही डेंग्यू प्रतिबंधाबाबत जनजागृती करण्यास सांगण्यात आले आहे.

Dengue Cases
Sugarcane Harvesting Transport Cost: ऊसतोडणी-वाहतुकीच्या खर्चात पारनेरचा कारखाना आघाडीवर; प्रतिटन १,३८५ रुपयांची कपात

रुग्णांमध्ये ५० टक्क्यांची वाढ

दरम्यान, शहरात अधूनमधून पडणारा पाऊस, उबदार हवामान, बांधकामांच्या ठिकाणी साचलेले पाणी आणि उघड्या टाक्यांमुळे डासांची उत्पत्ती वाढत आहे. काही खासगी रुग्णालयांमध्ये डेंग्यूच्या रुग्णांमध्ये जवळपास ५० टक्क्यांची वाढ झाल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे रुग्णांच्या उपचारांबरोबरच प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर द्यावा, असेही त्यांनी सूचित केले. तीव्र पोटदुखी, सतत उलट्या, रक्तस्त्राव किंवा अतिसुस्ती अशी लक्षणे दिसल्यास तातडीने वैद्यकीय उपचार घ्यावेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

डेंग्यूचे हॉटस्पॉट; औंध-बाणेर आघाडीवर

महापालिकेच्या क्षेत्रनिहाय आकडेवारीनुसार रुग्णसंख्येची नोंद :

  • औंध-बाणेर : २८०

  • कोथरूड : २७१

  • नगर रस्ता-वाघोली : २६७

  • येरवडा-वडगाव शेरी : २०१

  • कोंढवा-उंड्री : १२१

Dengue Cases
Indian Railway Parcel Service: रेल्वेची नवी सुविधा! आता घरातूनच पार्सल बुक करा, थेट इच्छित पत्त्यावर होणार डिलिव्हरी

डेंग्यूचा प्रादुर्भाव सरकारी रक्तपेढ्यांच्या मुळावर

शहरात डेंग्यूच्या वाढत्या रुग्णसंख्या आणि संसर्गजन्य प्रादुर्भावाच्या आजारांमुळे पुण्यात रक्ताचा तुटवडा निर्माण होत प्लेटलेट्सची मागणीही वाढली आहे. त्यामुळे रक्त आणि प्लेटलेट्स मिळविण्यासाठी नातेवाइकांची धावपळ सुरू आहे, तर दुसरीकडे रक्तदान शिबिरांची घटती संख्या आणि रक्तदात्यांचा कमी झालेला प्रतिसाद, यामुळे शासकीय आणि खासगी रक्तपेढ्यांवरील ताण वाढत चालला आहे.

शहराला दररोज सुमारे १ हजार ४०० ते १ हजार ५०० रक्तपिशव्यांची गरज असताना प्रत्यक्षात केवळ ८०० ते ९०० पिशव्याच उपलब्ध होत आहेत. त्यामुळे गरज आणि उपलब्धता, यांच्यात मोठी तफावत निर्माण झाली आहे. वैद्यकीय हब म्हणून उदयास आलेल्या पुणे शहरात विविध शस्त्रक्रिया, अपघात, प्रसूती, अवयव प्रत्यारोपणासह अन्य आजारांसाठी दररोज चौदाशे ते दीड हजार रक्त पिशव्यांची गरज भासते. त्यातच शहरात सध्या डेंग्यू आणि चिकुनगुनियासारख्या आजारांचे प्रमाण वाढत असल्यामुळे रक्ताबरोबरच प्लेटलेट्सची गरज वाढत आहे.

डेंग्यूमुळे काही रुग्णांच्या रक्तातील प्लेटलेट्सची संख्या कमी होते. अशा रुग्णांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्लेटलेट्स देण्याची आवश्यकता भासत आहे. मात्र, सणांच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयांना असलेल्या सुट्या, नोकरी-व्यवसायानिमित्त शहरात राहणारे अनेक नागरिक सणासाठी आपापल्या गावी जात असल्याने रक्तदात्यांची उपलब्धता कमी झाली आहे. त्यातच दिवसेंदिवस रक्तदान शिबिरांची संख्या घटत असल्याने रक्तसंकलनावर परिणाम होत आहे. परिणामी, रक्तपेढ्यांमधील साठा कमी होत असून, गरजू रुग्णांना रक्त मिळविण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. रक्ततुटवड्यावर शासनाने कायमस्वरूपी उपाययोजना राबवाव्या. गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने रक्ताचा तुटवडा निर्माण होण्याची परिस्थिती उद्भवत आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांवर रक्त मिळवण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे. तसेच, रक्तदाते उपलब्ध होत नसल्याने रुग्णांच्या नातेवाइकांना रक्त उपलब्ध करून देताना रक्तपेढ्यांचीही दमछाक होत आहे. त्यामुळे शासनाने यावर कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक आहे, अशी मागणी होत आहे.

Dengue Cases
Malegaon Sugar Factory: माळेगाव कारखान्याचा शेतकऱ्यांना दिलासा; अंतिम ऊसदरापोटी प्रतिटन १५० रुपये जमा

रक्तदान शिबिरे कमी झाल्याने सध्या रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यातच डेंग्यूमुळे रक्ताबरोबरच प्लेटलेट्सचीही मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. रोज प्लेटलेट्ससाठी ५० ते ६० कॉल येतात. त्यामुळे रक्तदान शिबिर भरवणे, रक्तदात्यांनी पुढे येऊन रक्तदान करणे गरजेचे आहे.

राम बांगड, रक्ताचे नाते ट्रस्ट

रुग्णालयात पन्नास पिशव्या रक्ताची गरज असल्यास केवळ २० रक्तदाते मिळतात, अशी परिस्थिती आहे. ही समस्या आत्ताच निर्माण झाली नसून जानेवारी महिन्यापासून रक्त तुटवड्याच्या समस्येचा सामना करावा लागत आहे.

दीपक पाटील, प्रशासकीय अधिकारी, कमला नेहरू रुग्णालय रक्तपेढी

खाटांच्या कमतरतेचे कारण देऊन रुग्णांना नाकारू नका, संशयित व निश्चित रुग्णांची आयएचआयपी पोर्टलवर नोंद करा. आर्थिक अडचणींमुळे उपचार रखडू नयेत, यासाठी सरकारी आरोग्य योजनांची माहिती द्यावी.

नवल किशोर राम, आयुक्त, महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news