Pune Court Lawyer Fight: न्यायालयातच वकिलांची हाणामारी! पुण्यात पक्षकारांवरून वाद टोकाला

शिवीगाळ, धक्काबुक्की ते रक्तबंबाळ मारहाण; वाढत्या स्पर्धेमुळे पुणे न्यायालय परिसरातील शिस्तीवर प्रश्नचिन्ह
Pune Court Lawyer Fight
Pune Court Lawyer FightPudhari
Published on
Updated on

शंकर कवडे

पुणे : न्यायदेवतेच्या मंदिरात संयम, शिस्त आणि कायद्याचा आदर बाळगण्याची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे, त्या वकिलांमध्येच शिवीगाळ, धक्काबुक्की ते थेट रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाणीच्या घटना होऊ लागल्या आहेत. पक्षकारांची पळवापळवी हे या वादाचे मुख्य कारण असून, बहुतांश वेळा असे वाद न्यायालयातच मिटवले जातात. तर, काही घटना पोलिस ठाण्यापर्यंतही पोहोचत आहेत. त्यामुळे, संयम, सभ्यता आणि कायद्याच्या सन्मानाचे प्रतीक असलेल्या न्यायालयात वकिलांच्या हाणामारी कळीचा मुद्दा ठरत आहे.

Pune Court Lawyer Fight
Elephantiasis Case Talegaon: तळेगाव दाभाडे येथे हत्तीरोग रुग्ण आढळला; परिसरातील 89 नागरिकांची रक्त तपासणी

शिवाजीनगर येथील जिल्हा व सत्र न्यायालयातील वकिलांची संघटना असलेल्या पुणे बार असोसिएशनचे पंधरा हजारांहून अधिक सदस्य आहेत. राज्यातील ही दुसऱ्या क्रमांकाची वकिलांची संघटना आहे. पुण्यातील वकिलीला कै. विजयराव मोहिते, कै. श्रीकांत शिवदे, कै. विराज काकडे यांपासून एस. कै. जैन, सुधीर शहा आदी नामवंत वकिलांची समृद्ध परंपरा लाभलेली आहे. मात्र, अलीकडे स्पर्धा वाढल्याने पक्षकार मिळविणे, कमी शुल्कात काम करून देणे किंवा पक्षकार पळविणे अशा कारणांवरून वकिलांमध्ये वाद वाढताना दिसत आहेत. या वादांचे रूप अनेकदा गुद्दागुद्दी, कपडे फाडणे आणि रक्तबंबाळ करीत मारहाण करण्यापर्यंत पोहोचत आहे. अशा घटना प्रमाणाने कमी असल्या तरी न्यायालयाच्या आवारात घडत असल्याने वकिली व्यवसायाच्या विश्वासार्हतेवर आणि न्यायालयीन शिस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

Pune Court Lawyer Fight
Shivneri Fort Bee Attack: शिवनेरी किल्ल्यावर मधमाशांचा हल्ला; चार शिवभक्त जखमी

न्यायालयात वकिलांमधील वादाच्या घटना अत्यंत दुर्दैवी असून, त्या संपूर्ण वकिलवर्गाच्या प्रतिमेला धक्का देणाऱ्या आहेत. पक्षकार मिळविणे किंवा इतर कारणांवरून निर्माण होणारे वाद हाणामारीपर्यंत जाणे अजिबात योग्य नाही. अशा प्रकारांना संघटना अजिबात पाठिंबा देणार नाही. वकिलांनी आपापसातील मतभेद संवादातून आणि संघटनेच्या माध्यमातून सोडवावेत. न्यायालयीन परिसरातील शिस्त राखणे ही प्रत्येक वकिलाची जबाबदारी आहे.

ॲड. काळुराम भुजबळ, अध्यक्ष, पुणे बार असोसिएशन

Pune Court Lawyer Fight
Pune Ring Road: पुणे रिंग रोड कामामुळे चार गावांचा पाणीपुरवठा खंडित; रांजणे–खामगाव परिसरात नागरिकांचे हाल

केस स्टडी 1

दिनांक : 24 फेबुवारी 2026

वेळ : दुपारी तीन

स्थळ : मोटार वाहन न्यायालय जवळ

न्यायालयीन प्रकरणे जास्त मिळत असल्याने एका 42 वर्षीय महिला वकिलाचे येथील दोन महिलांशी यापूर्वीही वाद झाले होते. घटनेच्या दिवशी त्या कामानिमित्त न्यायालयात आल्या असता, त्या दोन महिला वकिलांनी पुन्हा त्यांना दिवसभर त्रास दिला. “आज तुला कोणतेही काम करू देणार नाही, पैसे मिळवू देणार नाही,” अशी धमकी दिली. त्यानंतर, दुपारी त्या न्यायालयाबाहेर पडत असताना एका वकिलाने त्यांना बुक्की मारली, आणि त्यांचे केसही ओढले. तर, दुसऱ्या महिला वकिलाने टोकदार वस्तूने त्यांच्या डोक्यात वार केला. त्यामुळे, त्या जखमी झाल्या. या प्रकरणी संबंधित महिला वकिलाने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Pune Court Lawyer Fight
Nicotine Smoking Alternatives: सुरक्षित निकोटीन पर्याय उपलब्ध असलेल्या देशांत धूम्रपानात मोठी घट; थोलोस फाउंडेशनचा अहवाल

केस स्टडी 2

दिनांक : 13 नोव्हेंबर 2025

वेळ : दुपारी साडेतीन

स्थळ : सोसायटी ऑफिसजवळ

न्यायालयाच्या आवारात नोटरीचे काम करणाऱ्या एका 70 आणि 45 वर्षीय वकिलांमध्ये पक्षकारावरून चांगलीच जुंपली होती. हा वाद इतक्या विकोपाला गेला की या हाणामारीत दोघेही रक्तबंबाळ झाले, तर एका वकिलाचा शर्ट फाटला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी उपस्थित वकिलांनी हस्तक्षेप करत भांडणे मिटविली. त्यानंतर, एक वकिलाने पोलिस ठाण्याची पायरी चढण्याचा निर्णय घेतला. त्यावर वरिष्ठांनी त्याची समजूत काढल्यानंतर त्याने माघार घेतली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news