Pune Ring Road: पुणे रिंग रोड कामामुळे चार गावांचा पाणीपुरवठा खंडित; रांजणे–खामगाव परिसरात नागरिकांचे हाल

वरदाडे येथे जलवाहिनी उखडल्याने महिन्यांपासून पाणी बंद; सिंहगड भागातील ग्रामस्थांचा संताप, तातडीने उपाययोजनांची मागणी
Pune Ring Road Construction
Pune Ring Road ConstructionPudhari
Published on
Updated on

वेल्हे : पुणे-पानशेत रस्त्यावर सुरू असलेल्या पुणे बाह्यवळण रिंग रोड प्रकल्पाच्या कामामुळे सिंहगड भागातील रांजणे, खामगाव, कोंडगाव आणि आंबेड या चार गावांचा पाणीपुरवठा गेल्या काही महिन्यांपासून पूर्णपणे खंडित झाला आहे. यामुळे ग््राामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत.

Pune Ring Road Construction
Nicotine Smoking Alternatives: सुरक्षित निकोटीन पर्याय उपलब्ध असलेल्या देशांत धूम्रपानात मोठी घट; थोलोस फाउंडेशनचा अहवाल

रिंग रोडच्या कामामुळे या गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या जुन्या जलवाहिन्या बाधीत झाल्या आहेत. पानशेत रस्त्यावरील वरदाडे येथे रिंग रोडच्या कामात या जलवाहिन्या उखडल्या गेल्याने अनेक महिन्यांपासून पाणीपुरवठा बंद असल्याने नागरिकांचे अतोनात हाल सुरू आहेत. या भागातील नागरिक हे दुग्ध व्यवसायावर अवलंबून असल्याने वाढत्या उन्हाच्या कडाक्यात जनावरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे.

Pune Ring Road Construction
Tamhini Ghat Accident: ताम्हिणी घाटातील धोकादायक वळण अद्यापही बेवारस; सात जणांचा बळी गेल्यानंतरही सुरक्षा उपाय नाहीत

पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी पर्यायी जलवाहिनी आणि विहीर स्थलांतरासाठी जागा निश्चित करण्यात आली आहे, तसेच निधीही मंजूर झाला आहे. मात्र, प्रत्यक्ष कामाची अंमलबजावणी अद्याप पूर्ण न झाल्याने पाणीपुरवठा सुरू होण्यास विलंब होत आहे.

नवीन पाणीपुरवठा योजना पूर्ण होईपर्यंत संबंधित गावांना तात्पुरत्या स्वरूपात तातडीने पाणीपुरवठा सुरू करावा. जलवाहिनी स्थलांतर आणि नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम प्राधान्याने आणि ठराविक वेळेत पूर्ण करावे. अशी मागणी आमदार शंकर मांडेकर यांनी रस्ते विकास महामंडळ यांच्याकडे केली आहे.

Pune Ring Road Construction
MHT CET 2026: एमएचटी सीईटीसाठी तब्बल 11.42 लाख विद्यार्थ्यांची नोंदणी; अर्ज दुरुस्तीसाठी 5 ते 7 मार्चपर्यंत संधी

जिल्हा परिषद सदस्य अमोल नलावडे म्हणाले की, उन्हाचा कडाका वाढल्याने पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात भासत आहे. रस्ते विकास महामंडळाने दखल घेतली नाही तर स्थानिक ग््राामस्थांसह हंडा मोर्चा काढणार असल्याचे सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news