Pune Class 11 Admission Cutoff: अकरावी प्रवेशासाठी चुरस वाढली; पुण्यातील नामांकित महाविद्यालयांचे कटऑफ 8 ते 14 गुणांनी वाढले

बीएमसीसी, फर्ग्युसन, गरवारे, एसपीसह प्रमुख महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी मोठी स्पर्धा; विज्ञान आणि वाणिज्य शाखांकडे विद्यार्थ्यांचा वाढता कल
11th admission
11th admission file photo
Published on
Updated on

पुणे: पुण्यातील नामांकित कनिष्ठ महाविद्यालयांच्या अकरावी प्रवेशाच्या पहिल्या फेरीतील कटऑफ गुणांमध्ये 8 ते 14 गुणांची मोठी वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. नामांकित महाविद्यालयांचे कटऑफ 470 ते 480 गुणांच्या पुढे गेले असून, दहावीचा वाढलेला निकाल, सीबीएसई-आयसीएसई बोर्डातील विद्यार्थ्यांची संख्या आणि मर्यादित जागा यामुळे प्रवेशासाठी चुरस वाढल्याचे दिसून येत आहे. यंदा विज्ञान आणि वाणिज्य शाखांमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये मोठी स्पर्धा पाहायला मिळत आहे.

11th admission
Pune Crime: खडकीत महिला पोलिस अधिकाऱ्याच्या खुनाचा प्रयत्न; पतीला अटक

बीएमसीसीने वाणिज्य शाखेत पुन्हा आघाडी कायम ठेवत 482 गुणांचा कटऑफ नोंदवला. फर्ग्युसन कॉलेजच्या कला शाखेचाही कटऑफ 482 पर्यंत पोहोचला आहे. विज्ञान शाखेत महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटीचे ज्युनिअर कॉलेज, एसपी कॉलेज, एमईएस गरवारे कॉलेज, नेस वाडिया महाविद्यालय आणि मॉडर्न कॉलेज यांसारख्या महाविद्यालयांमध्ये मोठी स्पर्धा दिसून आली.

11th admission
Milindnagar SRA Scam: मिलिंदनगर एसआरए प्रकरण तापले; एसआयटी चौकशीसह दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

गेल्या वर्षीच्या तुलनेत बहुतांश महाविद्यालयांचे कटऑफ 8 ते 14 गुणांनी वाढले आहेत. विद्यार्थ्यांचा विज्ञान आणि वाणिज्य शाखांकडे वाढता कल, तसेच गुणवंत विद्यार्थ्यांची वाढलेली संख्या यामुळे कटऑफमध्ये वाढ झाल्याचे शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.

11th admission
Swargate Katraj Metro: स्वारगेट-कात्रज भूमिगत मेट्रोला वेग; मार्केट यार्ड, बिबवेवाडी, भारती विद्यापीठ येथे शाफ्ट खोदकाम सुरू

कॉलेजनिहाय शाखानुसार कटऑफ 2026

महाविद्यालय कला वाणिज्य विज्ञान

  • फर्ग्युसन कॉलेज: 482, 474, 478

  • बीएमसीसी: 482

  • एमईएस गरवारे कॉलेज: 458, 465, 478

  • नौरोसजी वाडिया कॉलेज: 448, 462, 477

  • मॉडर्न कॉलेज: 445, 460, 475

  • सिम्बायोसिस ज्यु. कॉलेज: 442, 468, 474

  • एसपी कॉलेज: 450, 464, 472

  • नेस वाडिया कॉलेज: 470

  • एमटीईएस ज्यु कॉलेज: 452, 466, 481

11th admission
Maharashtra Teacher Recruitment: शिक्षक भरती प्रक्रियेला मुदतवाढ; पवित्र पोर्टलवर 15 जूनपर्यंत अंतिम संधी

कटऑफ तुलना

महाविद्यालय शाखा 2025 2026 वाढ

  • बीएमसीसी वाणिज्य: 472 482 +10

  • फर्ग्युसन कॉलेज कला: 474 482 +8

  • गरवारे कॉलेज विज्ञान: 468 478 +10

  • नौरोसजी वाडिया विज्ञान: 466 477 +11

  • मॉडर्न कॉलेज विज्ञान: 462 475 +13

  • सिम्बायोसिस विज्ञान: 461 474 +13

  • एसपी कॉलेज विज्ञान: 458 472 +14

  • नेस वाडिया कॉलेज वाणिज्य: 459 470 +11

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news