Maharashtra Teacher Recruitment: शिक्षक भरती प्रक्रियेला मुदतवाढ; पवित्र पोर्टलवर 15 जूनपर्यंत अंतिम संधी

महाराष्ट्रातील शिक्षक भरती प्रक्रियेसाठी पवित्र पोर्टलवरील बिंदुनामावली तपासणीस 15 जून 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून भरती प्रक्रियेला गती मिळणार
Teacher
Teacher Pudhari
Published on
Updated on

पुणे: शिक्षक भरती प्रक्रियेला नवीन गती देण्यासाठी राज्य शासनाने पवित्र पोर्टलवर शिक्षकांच्या रिक्तपदांची जाहिरात नोंदविण्यासाठी 31 मेपर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतु, त्याला मुदतवाढ देण्यात आली असून, बिंदुनामावली तपासणी पूर्ण करण्यासाठी 15 जून 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी याबाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत.

Teacher
Maharashtra Agricultural Universities Staff Pattern: राज्यातील कृषी विद्यापीठांच्या सुधारित आकृतिबंधाला मान्यता; भरतीचा मार्ग मोकळा

राज्यातील अनेक शाळा आणि संस्थांमध्ये प्रशासकीय प्रक्रिया, बिंदुनामावली पडताळणी, संचमान्यता आणि इतर औपचारिकता अद्याप अपूर्ण असल्याने संस्थाचालकांनी शिक्षण विभागाकडे मुदतवाढीची मागणी केली होती.

Teacher
Pune Shriram Lagoo Theatre Festival: पुण्यात श्रीराम लागू राष्ट्रीय नाट्य महोत्सव; भारतीय रंगभूमीतील नव्या प्रयोगांवर चर्चा

या मागण्या स्वीकारून विभागाने जास्तीत जास्त संस्थांना प्रक्रियेत सामावून घेण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त राहिल्यास विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर थेट विपरीत परिणाम होऊ शकतो.

Teacher
Pune Andekar Gang Case: पुण्यात आंदेकर टोळीचा हल्ला प्रकरण; सीसीटीव्हीतून धक्कादायक खुलासे

त्यामुळे भरती प्रक्रिया कालबद्ध पद्धतीने पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे. त्या अनुषंगाने पवित्र पोर्टलद्वारे व्यवस्थापन पातळीवर निकष ठेवून संस्थांना रिक्तपदांची जाहिरात देण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

Teacher
Pune School Bus Fare Hike: पुण्यात स्कूल बस भाडे 15 ते 20% वाढण्याची शक्यता; डिझेल दरवाढीचा फटका

ही भरती शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 च्या गुणांवर आधारित होणार आहे. सध्या अनेक संस्थांमध्ये अकरावी-बारावीच्या संचमान्यतेची प्रक्रिया, बिंदुनामावली तपासणी आणि कर्मचारी संबंधित बाबी प्रलंबित आहेत. या सर्व प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणांना आदेश दिले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news