Swargate Katraj Metro: स्वारगेट-कात्रज भूमिगत मेट्रोला वेग; मार्केट यार्ड, बिबवेवाडी, भारती विद्यापीठ येथे शाफ्ट खोदकाम सुरू

दक्षिण पुण्यातील महत्त्वाच्या मेट्रो प्रकल्पाच्या कामाला गती; अत्याधुनिक मशिनरीच्या साहाय्याने स्थानक उभारणीची तयारी, डिसेंबर 2030 पर्यंत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट
Swargate Katraj Metro
Swargate Katraj MetroPudhari
Published on
Updated on

पुणे: स्वारगेट ते कात्रज या दक्षिण पुण्याच्या अत्यंत महत्त्वाच्या भूमिगत मेट्रोमार्गाचे काम आता प्रत्यक्ष जमिनीवर वेगाने सुरू झाले आहे. या मार्गावरील नियोजित भूमिगत स्थानकांसाठी आवश्यक असणारे ‌‘शाफ्ट‌’ (खड्डे) खोदण्याच्या कामाला सातारा रस्त्यावर प्रशासनाने सुरुवात केली आहे. मार्केट यार्ड, बिबवेवाडी आणि भारती विद्यापीठ या गर्दीच्या परिसरात स्थानकांच्या उभारणीसाठी अत्याधुनिक मशिनरीच्या साहाय्याने हे खोदकाम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.

Swargate Katraj Metro
Maharashtra Teacher Recruitment: शिक्षक भरती प्रक्रियेला मुदतवाढ; पवित्र पोर्टलवर 15 जूनपर्यंत अंतिम संधी

या भूमिगत मेट्रोमार्गामुळे स्वारगेट आणि कात्रज परिसरातील वाहतूक कोंडी कायमची फुटण्यास मदत होणार आहे. दरम्यान, हे संपूर्ण काम डिसेंबर 2030 अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे मेट्रो अधिकाऱ्यांनी दै. ‌‘पुढारी‌’च्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

Swargate Katraj Metro
Maharashtra SET Exam 2026: SET परीक्षा 2026: पुणे विद्यापीठाकडून वेळापत्रक जाहीर; 26 जुलैला परीक्षा

भूमिगत मेट्रो मार्गिका तयार करताना जमिनीखालील स्थानके तयार करणे हे मोठे तांत्रिक आव्हान असते. यासाठी सध्या मार्केट यार्ड, बिबवेवाडी आणि भारती विद्यापीठ परिसरामध्ये अत्याधुनिक आणि हायटेक मशिनरी तैनात करण्यात आल्या आहेत.

Swargate Katraj Metro
Maharashtra Agricultural Universities Staff Pattern: राज्यातील कृषी विद्यापीठांच्या सुधारित आकृतिबंधाला मान्यता; भरतीचा मार्ग मोकळा

या यंत्रांच्या साहाय्याने स्थानकांसाठी आवश्यक असणारे शाफ्ट खोदण्याचे काम सुरक्षित आणि नियोजित पद्धतीने सुरू आहे. भरवस्तीच्या आणि वर्दळीच्या भागात काम होत असल्याने नागरिकांना कमीत कमी त्रास होईल, याची काळजी घेत हे तंत्रज्ञान वापरले जात असल्याचे मेट्रो अधिकाऱ्यांनी सांगितले.

Swargate Katraj Metro
Pune Shriram Lagoo Theatre Festival: पुण्यात श्रीराम लागू राष्ट्रीय नाट्य महोत्सव; भारतीय रंगभूमीतील नव्या प्रयोगांवर चर्चा

स्वारगेट-कात्रज भूमिगत मेट्रोमार्गाचे काम निश्चित केलेल्या वेळेत पूर्ण करण्यासाठी महामेट्रो कटिबद्ध आहे. सध्या या मार्गावरील महत्त्वाच्या स्थानकांसाठी शाफ्ट खोदण्याचे काम अत्याधुनिक मशिनरीद्वारे अत्यंत वेगाने आणि सुरक्षिततेचे नियम पाळून सुरू करण्यात आले आहे. मार्केट यार्ड, बिबवेवाडी आणि भारती विद्यापीठ या भागांत प्रत्यक्ष कामाला गती मिळाली असून, आम्ही प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करत आहोत. पुणेकरांना जलद आणि दर्जेदार मेट्रो सेवा देण्याचा आमचा प्रयत्न आहे.

चंद्रशेखर तांबवेकर, अतिरिक्त महाव्यवस्थापक, महा मेट्रो

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news