पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे शहर काँग्रेस अंतर्गत वाद थेट आता रस्त्यांवर उतरला आहे. काँग्रेसचे जेष्ठ नेते, माजी आमदार उल्हास पवार यांनी लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश कार्यक्रमाला उपस्थिती लावल्याचा फोटो व्हायर झाल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गुलाबराव पाटील यांच्या जन्म शताब्दीचा कार्यक्रम विधी मंडळाच्या सेंट्रल हॉलमध्ये होता. या कार्यक्रमानंतर आम्ही सर्व जेवणासाठी यशवंतराव सेंटरमध्ये गेलो होतो. त्याठिकाणी सहज फोटो काढला. मात्र, त्यावरून अशा पद्धतीचे राजकारण करणे चुकीचे आहे, अशी प्रतिक्रिया आमदार उल्हास पवार यांनी दिली आहे.
उपस्थितीचे फोटोंचे फलकच शहराच्या विविध भागात लावण्यात आले आहेत. काँग्रेस कार्यकर्त्यांकडून त्यामुळे निष्ठावंत राहण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यामुळे लेटर बॉम्ब नंतर शहर काँग्रेसमध्ये फलक वॉर सुरू झाला आहे.
गत आठवड्यात काँग्रेसच्या एका नगरसेवकाने शहराध्यक्ष रमेश बागवे यांना पाठविलेल्या पत्राने चांगलीच खळबळ उडविली होती. पक्षातील काही मंडळी काँग्रेसचा हक्काचा पुणे लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडण्यासाठी जाणीवपूर्वक परिस्थिती निर्माण करीत असल्याचा आरोप या लेटर बॉम्ब मध्ये करण्यात आला होता. यानंतर चांगलीच खळबळ उडाली होती.
गुरुवारी लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. या कार्यक्रमाला पुण्यातील काँग्रेसचे जेष्ठ नेते, माजी आमदार उल्हास दादा पवार यांनीही हजेरी लावली होती.
खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर पवार यांच्या उपस्थितीचा फोटो टाकल्यानंतर हा प्रकार समोर आला. आता याच फोटोंचे फलक शहराच्या विविध भागात लावण्यात आल्या आहेत. काँग्रेसची मंडळी राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला कशी उपस्थितीत राहतात हेच दाखवून लेटर बॉंब मधील आरोपांवर या माध्यमातून एक प्रकारे शिक्का मोर्तब करण्यात आले आहे.
काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गुलाबराव पाटील यांच्या जन्म शताब्दीचा कार्यक्रम विधी मंडळाच्या सेंट्रल हॉल मध्ये होता. या कार्यक्रमानंतर आम्ही सर्व जण जेवणासाठी यशवंतराव सेंटरमध्ये गेलो होतो. त्याठिकाणी सहज फोटो काढला. मात्र, त्यावरून अशा पद्धतीचे राजकारण करणे चुकीचे आहे.
– उल्हास पवार, माजी आमदार
हे ही वाचलं का?
[visual_portfolio id="39086"]