Pune RPI Protest: अनुसूचित जाती उपवर्गीकरणाविरोधात आरपीआय आठवले गटाचा पुण्यात महामोर्चा; जातनिहाय जनगणनेची मागणी

भर पावसात हजारो कार्यकर्ते व ५९ समाज घटकांचा सहभाग; लोकसंख्येच्या प्रमाणानुसारच निर्णय घेण्याची मागणी
Pune RPI Protest
Pune RPI ProtestPudhari
Published on
Updated on

पुणे: अनुसूचित जातीमध्ये उपवर्गीकरण करण्याचा निर्णय राष्ट्रीय जातनिहाय जनगणनेनंतरच अचूक लोकसंख्येच्या प्रमाणानुसार अमलात आणावा, या मागणीसाठी रिपब्लिकन पक्ष आठवले गटाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया नजीकच्या आंबेडकर पुतळ्यापासून भव्य महामोर्चा काढण्यात आल्या. पक्षाचे पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर आणि पुणे ग्रामीण जिल्‍ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते व ५९ जातींमधील नागरिक भर पावसात उत्साहाने या मोर्चात सहभागी झाले.

Pune RPI Protest
Pune Zilla Parishad Meeting Incident: पुणे जिल्हा परिषद सभेत महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न; पेट्रोलची बाटली काढून..... मोठा अनर्थ टळला

या मोर्चात पुण्याचे उपमहापौर परशुराम वाडेकर, पुणे शहराध्यक्ष संजय सोनवणे, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, पिंपरी चिंचवड अध्यक्ष कुणाल न्हावळकर, पुणे जिल्हा अध्यक्ष श्रीकांत कदम, महिला आघाडी अध्यक्ष चंद्रकांता सोनकांबळे, प्रदेश उपाध्यक्ष हुलगेश चलवादी, बाळासाहेब भागवत, संगीता आठवले.

Pune RPI Protest
Maharashtra Direct Second Year Admission: पदविका निकाल प्रलंबित विद्यार्थ्यांना दिलासा; थेट द्वितीय वर्ष प्रवेशासाठी CET कक्षाची विशेष संधी

प्रदेश सचिव सूर्यकांत वाघमारे आदी पदाधिकारी यांच्यासह कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. बौद्ध समाज आणि इतर अनुसूचित जाती जमातीमधील ऐक्य व्यक्त करणार्‍या घोषणा या मोर्चात देण्यात आल्या. अनुसूचित जातींतील ५९ समाज घटकांमध्ये सामाजिक ऐक्य टिकवून ठेवणे ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)ची ठाम भूमिका आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news