Pune Crime: अनैतिक संबंधाच्या संशयातून तरुणाचा खून; आंबेगावातील थरारक घटना

धारदार हत्याराने वार करून हत्या; दोन संशयितांना पोलिसांनी घेतले ताब्यात
Murder
MurderPudhari
Published on
Updated on

पुणे: अनैतिक संबंधाच्या संशयावरून तरुणावर धारधार हत्याराने वार करून खून करण्यात आला. ही घटना कात्रजमधील आंबेगाव भागात रविवारी (दि.10) रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास इंद्रायणी कमानीजवळ घडली. दीपक क्षीरसागर (वय 38, रा. समर्थ हाईट्‌‍स, इंद्रायणीनगर, टेल्को कॉलनी, आंबेगाव) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

Murder
Pune Child Marriage Case: बालेवाडीत बालविवाह उधळला; नवरा मुलासह 35 जणांवर गुन्हा

याप्रकरणी आंबेगाव पोलिसांनी सिद्धार्थ संजय हातुरे (वय 26), ऋषीकेश मनोहर गायकवाड (वय 29, रा. जयशंकर सोसायटी, इंद्रायणीनगर, आंबेगाव) या दोघांना ताब्यात घेतले आहे. याबाबत कविता साठे (वय 34, रा. आंबेगाव खुर्द) यांनी फिर्याद दिली आहे.

Murder
Maharashtra FYJC Admission: अकरावी प्रवेशाकडे विद्यार्थ्यांची पाठ? राज्यातील 70 टक्के जागांसाठी नोंदणीच नाही

त्यानुसार आरोपींच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचा भाऊ दीपक क्षीरसागर हा पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागात कामाला होता. तो विवाहित होता.

Murder
100th Marathi Sahitya Sammelan: शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यात; स्थळाची घोषणा 14 जूनला

रविवारी रात्री जेवण केल्यानंतर तो इंद्रायणीनगर भागात घरासमोर थांबला होता. त्या वेळी दोघांनी त्याच्यावर धारधार हत्याराने वार केले. या घटनेची माहिती मिळताच आंबेगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शरद झिने यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी खून प्रकरणात चौकशी केली.

Murder
Maharashtra RTE Admission: RTE प्रवेशातील निवड यादी पूर्ण; आता प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना संधी

तेव्हा दीपक याचा अनैतिक संबंधातून खून झाल्याची माहिती प्राथमिक तपासात मिळाली. आरोपीच्या नात्यातील महिलेसोबत दीपक याचे अनैतिक संबंध होते. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक शरद झिने यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news