Pune Child Marriage Case: बालेवाडीत बालविवाह उधळला; नवरा मुलासह 35 जणांवर गुन्हा

14 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह लावल्याप्रकरणी बाणेर पोलिसांची कारवाई; मुलीला महिला आधारगृहात हलविले
Child Marriage
Child MarriagePudhari
Published on
Updated on

पुणे: बालेवाडीतील गोविंदनगर परिसरात बालविवाह झाल्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान, या विवाहाची माहिती मिळताच बाणेर पोलिस तेथे पोहोचले. पोलिसांनी विवाहात मिळालेले फोटोग््रााफस् आणि इतर पुरावे पाहून नवरा मुलगा शिवम नारायण पवार (वय 22, रा. गोविंदनगर, बालेवाडी) यांच्यासह त्याचे आई, वडील, मुलीची आई, नातेवाईक, पुरोहित, फोटोग््रााफरसह उपस्थित असणाऱ्या 30 ते 35 जणांवर बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

Child Marriage
Maharashtra FYJC Admission: अकरावी प्रवेशाकडे विद्यार्थ्यांची पाठ? राज्यातील 70 टक्के जागांसाठी नोंदणीच नाही

याप्रकरणी पोलिस कर्मचारी अभिजित रामदास घाटोळे (वय 35) यांनी बाणेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार रविवारी (दि.10) दुपारी सव्वाएक वाजण्याच्या सुमारास घडला आहे.

Child Marriage
100th Marathi Sahitya Sammelan: शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यात; स्थळाची घोषणा 14 जूनला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बालेवाडीतील गोंविदनगर शिवकृपा डेअरी जवळ बालविवाह होत असल्याची माहिती रविवारी दुपारी दीडच्या सुमारास पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला मिळाली होती. त्यानुसार बाणेर पोलिस विवाहस्थळी पोहोचले.

Child Marriage
Maharashtra RTE Admission: RTE प्रवेशातील निवड यादी पूर्ण; आता प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना संधी

त्यांनी मुलीच्या वयाची चौकशी केली. तिचे वय 14 वर्षे 8 महिने असल्याचे समोर आले. आरोपींनी मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असताना सुद्धा तिचा विवाह लावून दिला. मुलगी अल्पवयीन असल्याचे माहिती असताना देखील आरोपींनी पोलिस किंवा इतर कोणत्याही शासकीय कार्यालयास बालविवाह होण्यापूर्वी माहिती दिली नसल्याचे फिर्यादित नमूद केले आहे.

Child Marriage
Maharashtra Sugar Production: राज्यात 10.45 कोटी टन ऊस गाळप; साखर उत्पादनात कोल्हापूरचा दबदबा कायम

अल्पवयीन मुलीला महिला आधार गृहात पाठविण्यात आले आहे. तर, नवऱ्या मुलासह उपस्थितांना नोटीस बजावण्यात आली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक केकान करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news