Pune Airport Old Terminal: पुणे विमानतळाचे जुने टर्मिनल लवकरच प्रवाशांच्या सेवेत; प्रवासी क्षमता दुप्पट होणार

नूतनीकरणाचे काम पूर्ण; नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरोच्या अंतिम परवानगीची प्रतीक्षा
Plane
PlanePudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: पुणे विमानतळावरील जुन्या टर्मिनलच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले असून, फक्त नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरोची (बिकास) एक अंतिम परवानगी प्रलंबित आहे. ही परवानगी मिळताच हे टर्मिनल तातडीने प्रवाशांच्या सेवेत दाखल केले जाईल.

Plane
Khadakwasla Dam Water Storage: खडकवासला धरणाचे रब्बी आवर्तन बंद; ५६ दिवसांत ५.३४ टीएमसी पाणी वापर

यामुळे विमानतळाची प्रवासी हाताळणी क्षमता मोठ्या प्रमाणात वाढून प्रवाशांना विनाअडथळा प्रवास करता येणार आहे. लोहगाव येथील नवीन टर्मिनल सुरू झाल्यानंतर विमानतळ प्रशासनाने जुन्या इमारतीच्या अद्ययावतीकरणाचे काम वेगाने हाती घेतले होते. आता हे काम पूर्णत्वास गेले आहे. दोन्ही टर्मिनल्स कार्यरत झाल्यानंतर विमानतळाची एकूण प्रवासी क्षमता सध्याच्या तुलनेत दुपटीने वाढणार आहे.

Plane
Pune FDA Action: पुण्यातील आठ हॉटेल्सचे परवाने निलंबित; एफडीएची २० हॉटेल्सवर धडक कारवाई

प्रवाशांना होणारे फायदे

  • प्रामुख्याने पिक अवर्स (विमानांच्या गर्दीची वेळ), सणासुदीचे दिवस आणि सुट्ट्यांच्या काळात विमानतळावर होणारी प्रवाशांची कोंडी टळणार आहे.

  • चेक-इन काउंटर्स, सुरक्षा तपासणीच्या रांगा आणि बॅगेज बेल्ट्सची संख्या वाढल्यामुळे प्रवाशांचा विमानतळावरील वेळ वाचेल आणि तपासणी प्रक्रिया अधिक वेगवान होईल.

Plane
Bopodi Khadki Traffic: कोट्यवधी खर्चून रस्ता रुंदावला; तरीही बोपोडी-खडकीत वाहतूक कोंडी

दोन्ही टर्मिनल्स अंतर्गत एकमेकांना जोडणार....

सुरक्षा यंत्रणेची अंतिम मान्यता मिळताच जुन्या टर्मिनलवरून प्रत्यक्ष प्रवासी हाताळणी सुरू होईल. यामुळे पुणे विमानतळावरील पायाभूत सुविधांना मोठी बळकटी मिळणार आहे. विशेष म्हणजे, नवे आणि जुने असे दोन्ही टर्मिनल अंतर्गत रचनेद्वारे एकमेकांना जोडले जाणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना एकाच वेळी दोन्ही टर्मिनलमध्ये सहजपणे ये-जा करणे शक्य होणार आहे.

Plane
Nira Left Canal Water Shortage: २२ फाटा परिसरातील शेती संकटात! आवर्तन वेळेत न सुटल्याने शेतकऱ्यांचे गणित कोलमडले

पुणे विमानतळावरील जुन्या टर्मिनलच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले असून, फक्त नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरोची (बिकास) एक छोटी परवानगी शिल्लक आहे. ही मान्यता मिळताच हे टर्मिनल तातडीने प्रवाशांच्या सेवेत दाखल केले जाईल. दोन्ही टर्मिनल्स कार्यान्वित झाल्यामुळे विमानतळाची प्रवासी क्षमता दुपटीने वाढेल, ज्यामुळे विशेषतः पिक अवर्स आणि सुट्ट्यांच्या काळातील गर्दी टळून पुणेकरांचा प्रवास अधिक वेगवान आणि विनाअडथळा होणार आहे.

मुरलीधर मोहोळ, केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.