Nira Left Canal Water Shortage: २२ फाटा परिसरातील शेती संकटात! आवर्तन वेळेत न सुटल्याने शेतकऱ्यांचे गणित कोलमडले

१६०० हेक्टरवरील पीक धोक्यात
Nira Left Canal Water Shortage
Nira Left Canal Water ShortagePudhari
Published on: 
Updated on: 

माळेगाव: निरा डाव्या कालव्यावरील फाटा क्रमांक २२ अंतर्गत येणाऱ्या सुमारे १६०० हेक्टर शेतीवर पाणीटंचाईचे गंभीर संकट ओढवले आहे. जलसंपदा विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे गेली दोन आवर्तने वेळेत न मिळाल्याचा मोठा फटका या भागातील शेतकऱ्यांना बसला आहे. आधीच कमी पाऊस आणि घटलेली भूजल पातळी यामुळे शेती अडचणीत असताना कालव्याच्या पाण्याचे नियोजनही कोलमडल्याने शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

निरा डाव्या कालव्यावरील पाणी वितरणाचे नियोजन करताना फाटा क्रमांक १८ नंतर फाटा क्रमांक २२ आणि त्यानंतर फाटा क्रमांक २४ असा क्रम अपेक्षित असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र, जलसंपदा विभागाने पाणी वितरणाच्या नियोजनात बदल केल्याने फाटा क्रमांक २२ वरील शेतकऱ्यांना पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. नियोजनातील बदलाचा थेट परिणाम सिंचनावर झाला आहे. पिके जगवायची कशी? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.

Nira Left Canal Water Shortage
Shirur Onion Cultivation: पाणीटंचाईच्या धास्तीने कांदा लागवडीची लगबग; विकतच्या रोपांना शेतकऱ्यांची पसंती

फाटा क्रमांक २२ अंतर्गत जवळपास १६०० हेक्टर शेती क्षेत्र कालव्यावर अवलंबून आहे. सध्याच्या पाणीटंचाईच्या परिस्थितीत विहिरी आणि बोअरवेलच्या पाण्याची पातळीही खालावली आहे. त्यामुळे कालव्याचे पाणी वेळेत मिळणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र, दोन आवर्तने लांबल्याने , पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.

पहिल्या आवर्तनावेळी पाऊस झाल्याने फाटा क्रमांक २२ वरील पाणी वापर संस्थेने तत्काळ पाणी नको असल्याचे जलसंपदा विभागाला कळविले होते. मात्र, त्यानंतरच्या आवर्तनाचे नियोजन नियमित पद्धतीने करणे अपेक्षित होते.

Nira Left Canal Water Shortage
Indapur Voter List Objections: इंदापूरला मतदार यादीतील बोगसगिरी उघड; मोठा गोंधळ

परंतु तसे न झाल्याने शेतकऱ्यांना आता पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. दरम्यान, या प्रश्नावर शेतकऱ्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे तातडीने पाणी सोडण्याची मागणी केली आहे. जलसंपदा विभागाने पाणी वितरणातील नियोजनाचा फेरविचार करून फाटा क्रमांक २२ वरील शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी होत आहे.

पहिल्या आवर्तनावेळी फाटा क्रमांक २२ वरील पाणीवापर संस्थांना पाणी घेण्याबाबत कळविण्यात आले होते. त्या वेळी संबंधित संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सध्या पाण्याची आवश्यकता नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे उपलब्ध पाण्याच्या नियोजनात बदल करावा लागला.

- ए. टी. नारायणकर, उपअभियंता, जलसंपदा विभाग

पहिल्या आवर्तनावेळी पाऊस झाल्याने आम्हाला सध्या पाणी नको असल्याचे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना कळविले. मात्र, त्यानंतर दुसरे आवर्तन तरी नियमित आणि नियोजनबद्ध पद्धतीने सोडणे गरजेचे होते. सध्या शेतीला पाण्याची नितांत आवश्यकता असून, यासंदर्भात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे पाणी सोडण्याची मागणी केली आहे.

- सत्येंद्रसिंह जाधवराव, अध्यक्ष, बाणेश्वर पाणीवापर संस्था

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.