Khadakwasla Dam Water Storage: खडकवासला धरणाचे रब्बी आवर्तन बंद; ५६ दिवसांत ५.३४ टीएमसी पाणी वापर

धरणसाखळीत ७२.४७ टक्के पाणीसाठा; गतवर्षीच्या तुलनेत यंदा ६.३५ टीएमसीने घट
Khadakwasla Dam
Khadakwasla DamPudhari File Photo
Published on: 
Updated on: 

पुणे: खडकवासला धरणातून रब्बी हंगामासाठी शेतीच्या सिंचनासह पिण्याच्या पाण्यासाठी सुरू असलेले आवर्तन २० नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता बंद करण्यात आले. या आवर्तनाच्या ५६ दिवसांच्या कालावधीत एकूण ५.३४ टीएमसी पाण्याचा वापर झाला. त्यावेळी खडकवासला धरणसाखळीतील एकूण पाणीसाठा २१.२२ टीएमसी (७२.८१ टक्के) होता.

Khadakwasla Dam
Pune FDA Action: पुण्यातील आठ हॉटेल्सचे परवाने निलंबित; एफडीएची २० हॉटेल्सवर धडक कारवाई

चालू वर्षात आतापर्यंत खडकवासला धरणातून तीन आवर्तने देण्यात आली आहेत. यामध्ये पालखी सोहळ्यासाठी ७ ते १५ जुलैदरम्यान नऊ दिवसांचे विशेष आवर्तन सोडण्यात आले होते. या काळात ०.४६ टीएमसी पाणी वापरण्यात आले. त्यानंतर १६ जुलैपासून खरीप हंगामाचे आवर्तन सुरू करण्यात आले.

Khadakwasla Dam
Bopodi Khadki Traffic: कोट्यवधी खर्चून रस्ता रुंदावला; तरीही बोपोडी-खडकीत वाहतूक कोंडी

हे आवर्तन २५ सप्टेंबरपर्यंत, म्हणजेच ६० दिवस सुरू होते. या कालावधीत ६.४७ टीएमसी पाण्याचा वापर झाला. खरीप आवर्तनाला जोडूनच २६ सप्टेंबरपासून रब्बी हंगाम आणि पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सुरू करण्यात आले.

Khadakwasla Dam
Nira Left Canal Water Shortage: २२ फाटा परिसरातील शेती संकटात! आवर्तन वेळेत न सुटल्याने शेतकऱ्यांचे गणित कोलमडले

हे आवर्तन २० नोव्हेंबरपर्यंत सुरू होते. त्यापैकी १५ नोव्हेंबरपर्यंत सिंचनासाठी, तर १६ ते २० नोव्हेंबर या कालावधीत पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन देण्यात आले. या संपूर्ण कालावधीत ५.३४ टीएमसी पाणी वापरण्यात आले.

Khadakwasla Dam
Shirur Onion Cultivation: पाणीटंचाईच्या धास्तीने कांदा लागवडीची लगबग; विकतच्या रोपांना शेतकऱ्यांची पसंती

धरणसाखळीतील पाणीसाठा २१.१२ टीएमसी

२१ नोव्हेंबर रोजी सकाळच्या नोंदीनुसार खडकवासला धरणसाखळीतील पाणीसाठा २१.१२ टीएमसी (७२.४७ टक्के) इतका आहे. गतवर्षी याच दिवशी हा साठा २७.४७ टीएमसी (९४.२७ टक्के) होता. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा धरणसाखळीत ६.३५ टीएमसीने कमी पाणीसाठा आहे. आगामी काळातील पिण्याच्या पाण्याचे नियोजन आणि उन्हाळ्यातील पाणी उपलब्धतेच्या दृष्टीने हा कमी झालेला साठा महत्त्वाचा ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.