पुणे; पुढारी वृत्तसेवा : निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या किशोरी गटामध्ये सह्याद्री क्रीडा प्रतिष्ठान संघाने प्रतिस्पर्धी संघाचा पराभव करीत आगेकूच केली. सिध्दिविनायक मित्र मंडळ बाणेर व पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने ही स्पर्धा आयोजित केली आहे.
या स्पर्धेत किशोरी गट मुली व महिलांच्या विभागात झालेल्या साखळी सामन्यात किशोरी गटात लोकश्री क्रीडा ज्ञानपीठ या संघाने मातृभूमी क्रीडा प्रतिष्ठान संघावर 40-13 अशी मात केली. मध्यंतराला लोकश्री क्रीडा प्रतिष्ठानाकडे 21-6 अशी आघाडी होती. सह्याद्री क्रीडा प्रतिष्ठान या संघाने लोकश्री क्रीडा प्रतिष्ठान या संघावर 29-25 असा विजय मिळवला. मध्यंतराला सह्याद्री क्रीडा प्रतिष्ठानकडे 12-11 अशी आघाडी होती.
एम. एच. स्पोर्ट्स संघाने लोणकर माध्यमिक विद्यालय संघावर 37-12 असा विजय मिळवला. मध्यंतराला एम. एच. स्पोर्ट्स क्लब संघाकडे 24-4 अशी आघाडी होती. महिलांच्या झालेल्या सामन्यांमध्ये सुवर्ण युग स्पोर्ट्स संघाने जागृती प्रतिष्ठानवर 42-6 असा दणदणीत विजय मिळवला. मध्यंतराला सुवर्णयुग संघाकडे 21-3 अशी आघाडी होती. विजय माला कबड्डी संघाने मातृभूमी क्रीडा प्रतिष्ठान संघावर 26-15 असा विजय मिळवला. मध्यंतराला विजय माला संघाकडे 16-8 अशी आघाडी होती. प्रकाश तात्या बालवडकर संघाने मातृभूमी क्रीडा प्रतिष्ठान संघावर 72-15 असा धुव्वा उडवीत एकतर्फी विजय मिळवला.
हेही वाचा