

पुणे : बाणेर आणि कोंढवा परिसरातील वेश्याव्यवसायावर पोलिसांनी छापे टाकून कारवाई केली. बाणेर येथील लॉजवर वेश्याव्यवसाय सुरू होता तर, एनआयबीएम कोंढवा रोड येथे स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू होता. याप्रकरणी, बाणेर आणि काळेपडळ पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
बाणेर भागातील एका लाॅजमध्ये सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला. बाणेर पोलिसांनी लाॅजवर छापा टाकून तरुणींची सुटका केली. या कारवाईत लाॅज व्यवस्थापकासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाॅज व्यवस्थापकाला अटक करण्यात आली.
प्रकाश ज्ञानेश्वर गायकवाड (वय २४, सध्या रा. फलक इन लाॅज, लक्ष्मणनगर, बाणेर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. तर बाळू सुभाष चौधरी, अजितसिंग जितेंद्रपाल गाढोके, दलाल रोशन यांच्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला. याबाबत पोलीस शिपाई रोहित पाथरूट यांनी फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्यान्वये (पीटा) गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाणेरमधील लक्ष्मणनगर भागातील एका लाॅजमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. आरोपींनी तरुणींना पैशांचे आमिष दाखवून त्याने देहविक्रय करण्यास प्रवृत्त केले. पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या माध्यमातून खातरजमा केली. पोलिसांनी छापा टाकून लाॅजमधून तरुणींची सुटका केली. लाॅज व्यवस्थापकाला अटक करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक अलका सगर, सहायक निरीक्षक लामखेडे, केकाण आणि पथकाने ही कारवाई केली.
तसेच दुसरी कारवाई गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक व प्रतिबंधक कक्षाने एनआयबीएम रोड कोंढवा परिसरातील एका स्पा सेंटरवर केली आहे. तेथून पाच पिडीत महिलांची सुटका करण्यात आली आहे. स्पा सेंटरच्या आडून तेथे देहविक्री सुरू असल्याचे पुढे आले आहे. याप्रकरणी, स्पा मॅनेजर ॲन्थोनी विल्सन स्वामी (वय.39) याला अटक करण्यात आली आहे. तर स्पा मालकीन निशा हिच्या विरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक काद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत महिला पोलिस हवालदार रेश्र्मा कंक यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एनआयबीएम रोड कोंढवा येथील रॉयल हेरिटेज मॉलमधील ज्युवेनेक्स स्पा ब्युटी ॲण्ड वेलनेस येते स्पाच्या आडून वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंधक कक्षाला मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक आशालता खापरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने बनावट ग्राहक पाठवून खात्री केली. त्यावेळी तेथे वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार सोमवारी सायंकाळी सव्वा पाच वाजताच्या सुमारास पथकाने छापा टाकून पाच पिडीत महिलांची सुटका केली. स्पा सेंटरमधून 18 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. स्पा मॅनेजर आणि स्पा मालकीन हे महिलांना पैशांचे आमिष दाखवू त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेऊन त्यातून मिळणाऱ्या पैशावर आपली उपजिवका भागवत असल्याचे तपासात समोर आले आहे. दोघांवर गुन्हा दाखल करून पोलिसांनी स्पा मॅनेजरला अटक केली आहे. ही कामगिरी पोलिस उपायुक्त निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलि निरीक्षक आशालता खापरे, कर्मचारी तुषार भिवरकर, बबन केदार, दत्ता जाधव, किशोर भुजबळ, रेश्र्मा कंक, अमेय रसाळ यांच्या पथकाने केली.
फोटोः आजच्या तारखेला सामाजिक नावाने सेव्ह आहे.
ओळ.ः अटक स्पा मॅनेजर, सुटका केलेल्या पिडीत महिला गुन्हे शाखेचे अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंधक कक्षाचे पथक