Bopodi Government Land Scam: बोपोडी सरकारी जमीन गैरव्यवहार प्रकरणी तत्कालीन तहसीलदाराचा अटकपूर्व जामीन फेटाळला

महसूलमंत्री व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप; न्यायालयाचा कडक निर्णय
Pune Government Land Scam
Pune Government Land ScamPudhari
Published on
Updated on

पुणे: बोपोडी येथील सरकारी जमीन गैरव्यवहार प्रकरणात गुन्हा दाखल असलेला तत्कालीन तहसीलदार सूर्यकांत येवले याचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. वाय. लाडेकर यांच्या न्यायालयाने सोमवारी फेटाळला. शासकीय जमीन असतानाही येवले याने तत्कालीन महसूलमंत्री आणि अप्पर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले, असा युक्तिवाद सरकारपक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी केला. तो ग््रााह्य धरत न्यायालयाने जामीन अर्ज नामंजूर केला. याबाबत नायब तहसीलदार प्रविणा बोर्डे यांनी सरकारतर्फे तक्रार दिली आहे.

Pune Government Land Scam
Maharashtra Cooperative Policy: महाराष्ट्राचे नवीन सहकारी धोरण सर्वसमावेशक व भविष्योन्मुख : बाबासाहेब पाटील

या प्रकरणात अटकपूर्व जामिनासाठी येवले याने न्यायालयात अर्ज केला होता. त्याच्या वतीने युक्तिवाद करताना ॲड. हर्षद निंबाळकर म्हणाले की, या प्रकरणात कूळ आहे की नाही हे ठरविण्याचा अधिकार येवले यांना असून, त्यांनी प्राधिकरण म्हणून याबाबतचा निकाल दिला होता. तब्बल नऊ महिने याबाबत सुनावणी झाली.

Pune Government Land Scam
Gutkha Transport Racket: ओतूर पोलिसांचा गुटखा वाहतूक टोळीवर छापा; 48.40 लाखांचा मुद्देमाल जप्त

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद झाल्यानंतर हा निकाल देण्यात आला होता. तसेच अपिलासाठी देखील वेळ देण्यात आली होती. त्यांनी दिलेला निर्णय बरोबर आहे की नाही, याबाबत योग्य त्या ठिकाणी अपील करणे आवश्यक आहे. त्यासाठी फौजदारी कारवाई योग्य नाही. तसेच त्यांच्यावर लावण्यात आलेली तीनही कलमे यात लागू होत नाहीत. त्यामुळे त्यांनी केलेला अटकपूर्व जामिनाचा अर्ज मंजूर करण्यात यावा, असा युक्तिवाद ॲड. निंबाळकर यांनी केला.

Pune Government Land Scam
Malegaon Nagar Panchayat Election: माळेगाव नगरपंचायतीत अपक्षांचा ‘दे धक्का’; अजित पवार–रंजन तावरे युतीला मोठा धक्का

सरकारपक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील प्रमोद बोंबटकर म्हणाले की, जमिनीबाबत तत्कालीन महसूलमंत्र्यांनी दोनवेळा रीग््राांटचा अर्ज नामंजूर केला होता. गुन्ह्यातील आरोपी शीतल तेजवानी हिने उच्च न्यायालयात वतनदारांच्या वतीने केलेली रीट याचिका फेटाळली असताना अमेडीया कंपनीच्या पत्रावरून बोटॅनिकल सर्वे ऑफ इंडियाला जमीन खाली करण्याचे निर्देश येवले याने दिले. व्यावसायिकांशी संगनमत करून शासनाच्या जमिनीची विल्हेवाट लावली.

Pune Government Land Scam
Bhimashankar Temple Development: भीमाशंकर मंदिर विकासकामांसाठी सुमारे तीन महिने बंद ठेवण्याची शक्यता

यातून त्याचा हेतू दिसून येतो. महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन कायद्यानुसार शासकीय जमिनी कुळवहिवाटीमधून वगळलेल्या असताना त्यासंबंधी हेतुपुरस्सर खासगी विकसकांच्या बाजूने निर्णय दिला. या गुन्ह्यात येवले हा प्रमुख आरोपी असून, त्याच्या पुढाकाराने व सहकार्यानेच हा गुन्हा घडला आहे, असा युक्तिवाद ॲड. बोंबटकर यांनी केला. न्यायालयाने बचावपक्षासह सरकारपक्षाचा युक्तिवाद ऐकून घेत जामीन फेटाळून लावला. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रेय वाघमारे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news