House Burglary Pune: दोन घरफोड्यांत साडेतीन लाखांचा ऐवज चोरीला

सदाशिवपेठ व शिवणे-कोथरुड परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ; दोन पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल
House Burglary Pune
House Burglary PunePudhari
Published on
Updated on

पुणेः सदाशिवपेठ, नवीन शिवणे कोथरुड परिसरात चोरट्यांनी सदनिका आणि प्रिटींगप्रेसच्या दुकानात चोरी करून चोरट्यांनी तीन लाख 38 हजार रुपयांचा ऐवज चोरी केला आहे. याप्रकरणी, पर्वती आणि अलंकार पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

House Burglary Pune
Pune Municipal Election BJP Candidate List: पुणे महापालिका निवडणूक; भाजपची पहिली उमेदवार यादी 26 डिसेंबरला?

सदाशिव पेठेतील एका सदनिकेतून चोरट्यांनी रोकड,चांदीची नानी, तांब्याची पातेली असा 38 हजार रुपयांचा ऐव चोरी केला. याप्रकरणी, 73 वर्षीय जेष्ठाने फिर्याद दिली आहे. त्यानुसार पर्वती पोलिसांनी चोरट्याच्या विरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.

House Burglary Pune
Property Tax Dues During Flat Registration: जुनी सदनिका खरेदी करताना मालमत्ताकर थकबाकी लगेच कळणार

फिर्यादींची सदाशिव पेठेतील विजयनगर कॉलनीत सदनिका आहे. दरम्यानच्या काळात त्यांची सदनिका बंद असताना, चोरट्यांनी दरवाजाचा कडीकोयंडा उचकटून चोरी केली आहे.

House Burglary Pune
DRDO Scientist Espionage Case: डीआरडीओचे माजी संचालक प्रदीप कुरुलकर प्रकरणी आरोपनिश्चिती सुनावणी 12 जानेवारीला

तर दुसरी चोरीची घटना वनदेवी चौक नवीन शिवणे कोथरुड येथील ड्रीम कॅचर या फ्लेक्स प्रिंटगच्या दुकानात घडली आहे. चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून प्रिटींग प्रेस मशीनचे झाकन खोलून तीन लाख रुपये किंमतीचे प्रिटींग हेड चोरी केले आहेत.

House Burglary Pune
Bopodi Government Land Scam: बोपोडी सरकारी जमीन गैरव्यवहार प्रकरणी तत्कालीन तहसीलदाराचा अटकपूर्व जामीन फेटाळला

याप्रकरणी, कर्वेनगर येथील 35 वर्षीय दुकान मालकाने अलंकार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 21 ते 22 डिसेंबरच्या दरम्यान फिर्यादींचे दुकान बंद असताना चोरट्यांनी ही चोरी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news