Property Tax Dues During Flat Registration: जुनी सदनिका खरेदी करताना मालमत्ताकर थकबाकी लगेच कळणार

मुंबई वगळता 27 महापालिकांत दस्त नोंदणीवेळी ऑनलाइन माहिती उपलब्ध; खरेदीदारांची फसवणूक टळणार
Property Tax
Property TaxPudhari
Published on
Updated on

पुणे: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रांमध्ये जुनी सदनिका घेताना त्यावर मालमत्ताकराची थकबाकी असल्यास दस्त नोंदणी करताना त्याची माहिती लगेच मिळणार आहे. परिणामी खरेदीदाराची होणारी फसवणूक टळणार आहे. नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने राज्यातील मुंबई वगळता सर्व 28 महापालिकांमध्ये हीसुविधा सुरू केली आहे.

Property Tax
DRDO Scientist Espionage Case: डीआरडीओचे माजी संचालक प्रदीप कुरुलकर प्रकरणी आरोपनिश्चिती सुनावणी 12 जानेवारीला

राज्यात मेट्रो शहरांमध्ये सध्या नव्या सदनिकांचे दर सातत्याने वाढत आहेत. परिणामी काही ग््रााहक जुन्या सदनिका खरेदी करण्यावर भर देत आहेत. मात्र, या सदनिकांवर स्थानिक स्वराज्य संस्थाच्या (महापालिका) मालमत्ता तसेच अन्य करांची थकबाकी असते. संबंधित घरमालक ही थकबाकी जाणीवपूर्वक लपवितो. त्यामुळे खरेदीदार मालमत्ता कर पावती नावावर करण्यासाठी महापालिकेत गेल्यानंतर त्याला थकबाकीची माहिती समजते.

Property Tax
Bopodi Government Land Scam: बोपोडी सरकारी जमीन गैरव्यवहार प्रकरणी तत्कालीन तहसीलदाराचा अटकपूर्व जामीन फेटाळला

तसेच थकबाकी भरल्यानंतरच मालकी हक्कात बदल केला जाईल, असे संबधित विभागातील अधिकार्‌‍यांकडून सांगितले जाते. विक्री करणाऱ्याने ही बाब लपविल्याने संबंधित खरेदीदाराला आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. त्याचा खरेदीदाराला मनस्तापही होतो. त्यामुळे महापालिकेची असलेली करांची थकबाकी ऑनलाइन दिसावी अशी प्रणाली तयार करण्याचे काम नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून सुरू होते.

Property Tax
Maharashtra Cooperative Policy: महाराष्ट्राचे नवीन सहकारी धोरण सर्वसमावेशक व भविष्योन्मुख : बाबासाहेब पाटील

27 महापालिकांमध्ये सुविधा उपलब्ध

सुरुवातीला 2016 मध्ये पुणे महापालिकेच्या कार्यक्षेत्रात खरेदी होणाऱ्या जुन्या सदनिकांच्या दस्त नोंदणी वेळी कराची माहिती उपलब्ध करण्याचा प्रयोग केला होता. अन्य शहरांमध्ये ही सुविधा उपलब्ध नव्हती. त्यानुसार आता नोंदणी मुद्रांक शुल्क विभागाने दस्त नोंदणीच्या आय सरिता या पोर्टलवर आता ही सुविधा मुंबई वगळता अन्य 27 महापालिकांमध्ये उपलब्ध करून दिली आहे.

Property Tax
Gutkha Transport Racket: ओतूर पोलिसांचा गुटखा वाहतूक टोळीवर छापा; 48.40 लाखांचा मुद्देमाल जप्त

property tax dues during flat registrationराज्यातील या महापालिकांमध्ये सुरू झाली सुविधा

पुणे, पिंपरी-चिंचवड, अहिल्यानगर, ठाणे, इचलकरंजी, कोल्हापूर, वसई-विरार, लातूर, उल्हासनगर, मीरा-भाईंदर, भिवंडी, सांगली, मालेगाव, धुळे, जालना, जळगाव, अमरावती, परभणी, अकोला, चंद्रपूर, पनवेल, छ. संभाजीनगर, नवी मुंबई, नांदेड, सोलापूर, कल्याण, डोंबिवली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news