Maharashtra Legislative Council Election: विधान परिषद निवडणूक: पार्थ पवारांची भूमिका ठरणार निर्णायक?

राष्ट्रवादीत उमेदवारीसाठी अनेक नावांची चर्चा; तीन दिवसांत चित्र स्पष्ट होणार
Parth Pawar
Parth PawarPudhari
Published on
Updated on

पुणे: विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे तीन दिवस शिल्लक राहिले असल्याने सर्व पक्षांमध्ये जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. राज्याच्या राजकीय वर्तुळात सर्वाधिक चर्चा आहे ती अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग््रेासकडून विधान परिषदेवर कोण जाणार याविषयी. त्याचे प्रमुख कारण म्हणजे अजित पवारांच्या निधनानंतर पार्थ पवार यांची पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बघायला मिळत आहे.

Parth Pawar
Kondhwa Water Crisis: कोंढवा-उंड्रीत भीषण पाणीटंचाई; नागरिक टँकरवर अवलंबून

या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून पार्थ पवार यांना त्यांची स्वतःची विश्वासू टीम बनवण्याची संधी आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग््रेासकडून उमेदवारी ठरवताना पार्थ पवार यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. राज्यात पुढच्या तीन वर्षांनंतर लोकसभा आणि विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यासाठी पक्षाचे संघटन मजबूत करून निवडणुकीत पक्षाला अपेक्षित यश मिळवून द्यायचं असेल, तर पार्थ पवार यांना त्यांची स्वतःची विश्वासू टीम लागेल. या टीमध्ये जुनेजाणते अनुभवी लोक जसे हवेत, तसेच नव्या दमाचे शिलेदार देखील लागतील. हे नव्या दमाचे शिलेदार निवडण्याची सुरुवात या विधान परिषदेच्या निवडणुकीपासून करण्यासाठी पार्थ पवारांना ही योग्य वेळ ठरू शकते. शिवाय दीर्घकालीन राजकारणासाठी स्वतःची विश्वासू टीम उपयुक्त ठरू शकेल.

Parth Pawar
Cheese Analogue Rules: पुण्यात चीज ॲनालॉगबाबत कडक नियम; बनावट पनीरविरोधात मोहीम

पक्षातील सूत्रांच्या माहितीनुसार, प्रदेशाध्यक्ष व खासदार सुनील तटकरे यांचे पुत्र अनिकेत तटकरे, प्रफुल्ल पटेल यांचे निकटवर्तीय माजी आमदार राजेंद्र जैन, माजी आमदार व पुणे शहराचे अध्यक्ष सुनील टिंगरे, प्रवक्ते आनंद परांजपे, उमेश पाटील आदींची नावे चर्चेत आहेत. यासोबतच माजी खासदार संजय काकडे यांचे पुत्र विक्रम काकडे यांचे देखील नाव चर्चेत आहे. यांपैकी कोणाला संधी मिळणार, की अन्य कोणाची वर्णी लागणार हे 30 एप्रिल रोजी स्पष्ट होईल. परंतु, चर्चेत असलेल्या नावांवर विचार करता सुनील तटकरे स्वतः प्रदेशाध्यक्ष असून, ते लोकसभेत खासदार आहेत. त्यांची मुलगी अदिती तटकरे राज्यात मंत्री आहेत.

Parth Pawar
Junnar Pond Drowning: जुन्नरमध्ये शेततळ्यात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू

सुनील टिंगरे हे माजी आमदार असून, सध्या त्यांच्याकडे पुणे शहराच्या अध्यक्षपदाची धुरा आहे. आनंद परांजपे माजी खासदार आहेत व त्यांच्याकडे पक्षाचे प्रवक्तेपद आहे. विक्रम काकडे यांची पार्थ पवारांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळख आहे. पक्षाचे नेतृत्व दिवंगत अजित पवार यांच्याबरोबर आणि त्यांच्या परिवाराबरोबर त्यांचा अनेक वर्षांपासून ते काम करत आहेत. शिवाय विक्रम काकडे यांना राजकीय वारसा देखील आहे.

Parth Pawar
Court Maintenance Order: कमावती पत्नीही पोटगीस पात्र; पिंपरी न्यायालयाचा निर्णय

पुणे शहरात यापूर्वी विक्रम काकडे यांचे वडील संजय काकडे यांनी 40 नगरसेवक निवडून आणले होते. याच अनुषंगाने भविष्यात हीच ताकद विक्रम काकडे यांच्या माध्यमाने पुणे शहरात राष्ट्रवादीकडे वाढू शकते, त्यामुळे या चर्चेत असलेल्या नावांपैकी कोणाला संधी मिळणार याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका घेण्यात पार्थ पवार दिसतील का? याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news