Junnar Pond Drowning: जुन्नरमध्ये शेततळ्यात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू

बल्लाळवाडीत दुर्दैवी घटना; परिसरात शोककळा, पालकांना सावधगिरीचे आवाहन
Drowning death
Drowning deathPudhari
Published on
Updated on

नारायणगाव: जुन्नर तालुक्यातील बल्लाळवाडी येथे शेततळ्यात बुडून दोन लहान मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना आज मंगळवारी (दि. २८) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Drowning death
Court Maintenance Order: कमावती पत्नीही पोटगीस पात्र; पिंपरी न्यायालयाचा निर्णय

मृत मुलांची नावे सोहम जयसिंग नवले (वय १२) आणि अभि महेश पवार (वय १०) अशी असल्याचे समजते. गाडेकर यांच्या शेतातील तळ्यात ही दुर्घटना घडल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस यंत्रणा आणि रेस्क्यू टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली असून संबंधित मुलांचे मृतदेह शेततळ्यातून बाहेर काढण्यात आले आहेत.

Drowning death
Pune Drug Trafficking Network: पुण्यात राजस्थानी ड्रग्ज रॅकेटचा विळखा; एमडी जप्तीने खळबळ

या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून ग्रामस्थांमध्ये शोककळा पसरली आहे. दरम्यान, अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी लहान मुलांनी शेततळे किंवा पाण्याच्या साठ्यांमध्ये अंघोळीसाठी जाणे टाळावे, पालकांनी याबाबतची काळजी घ्यावी, असे आवाहन सुधीर महाराज घोलप यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news