

पुणे: अन्न व औषध प्रशासनाने सर्व रेस्टॉरंट, केटरर्स, हॉटेल्स व फास्ट फूड विक्रेत्यांना अन्नपदार्थांमध्ये वापरल्या जाणाऱ्या चीज ॲनालॉगबाबत ग््रााहकांना स्पष्ट माहिती देण्याचे निर्देश दिले आहेत. अन्नसुरक्षा व मानके कायदा 2006 नुसार ग््रााहकांना अन्नातील घटकांची अचूक माहिती मिळणे आवश्यक आहे.
पनीर हे शुद्ध दुधापासून तयार होते, तर चीज ॲनालॉग हे खाद्यतेल, स्टार्च व इतर घटकांपासून बनविलेले असल्याने त्याचे स्वरूप वेगळे असते. चीज ॲनालॉग वापरून तयार केलेल्या पदार्थांची माहिती बिलावर नमूद करणे बंधनकारक आहे. मेन्यू कार्ड, इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले बोर्डवर स्पष्ट उल्लेख आवश्यक आहे. उत्पादक व पुरवठादारांनी विक्री बिलावर डेअरी/चीज ॲनालॉग असा स्पष्ट उल्लेख करणे आवश्यक आहे, असे एफडीएतर्फे नमूद करण्यात आले आहे.
पुणे विभागातील रेस्टॉरंट, केटरर्स, हॉटेल्स, फास्ट फूड विक्रेते तसेच चीज ॲनालॉगचे उत्पादक, पनीरचे उत्पादक, पुरवठादार यांनी कायद्यातील तरतुदीचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास त्यांच्यावर प्रशासनामार्फत अन्नसुरक्षा व मानके अधिनियम 2006, नियम व नियमनेअंतर्गत संबंधितांवर कठोर कारवाई घेण्यात येईल. तसेच, ग््रााहकांनी अशा प्रकारची दिशाभूल झाल्यास त्याबाबत तक्रार प्रशासनाच्या 1800-222-365 या टोल फी क्रमांकावर नोंदवावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त (अन्न) दिगंबर भोगावडे यांनी केले आहे.
ग््रााहकांमध्ये चीज ॲनालॉग (बनावट पनीर) ओळखण्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी राज्याचा अन्न व औषध प्रशासन विभाग आणि दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाने संयुक्त मोहीम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे बाजारपेठांमधील बनावट पनीरच्या विक्रीस पायबंद बसून स्वतःहून ग््रााहकच दुधापासूनचे पनीरची मागणी करतील, यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.
पनीर हा केवळ दुधापासून बनविलेला पदार्थ आहे. मात्र, काही रेस्टॉरंट, केटरर्स, हॉटेल्स, फास्ट फूड विक्रेत्यांकडे डेअरी ॲनालॉग हा दुधाव्यतिरिक्त इतर खाद्यतेल, स्टार्च व इतर घटक वापरून बनविलेला पदार्थ ग््रााहकांच्या गळ्यात मारला जात असल्याच्या तक्रारी आहेत. पनीरसारखा दिसतो, पण डेअरी ॲनालॉग पनीर नसल्याबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाने मार्गदर्शक तत्त्वे, सूचना व प्रसिद्धिपत्रकही जारी केले आहे. त्याद्वारे ग््रााहकांमध्ये संयुक्तपणे जागरूकता निर्माण करण्यासाठी कल्याणकारी संघाचा आग््राह आहे.
या विषयावर सोमवारी (दि.27) कल्याणकारी संघाचे अध्यक्ष गोपाळराव म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली संस्थेचे मानद सचिव व ऊर्जा दूधचे संचालक प्रकाश कुतवळ, संगमनेरमधील राजहंस दूधचे चेअरमन रणजितसिंह देशमुख, चितळे दूधचे निखिल चितळे, गोंविद दूधचे डॉ. संकपाळ, कन्हैया दूधचे मच्छिंद्र लंके, सोनाई दूधचे जोशी व अन्य प्रतिनिधींनी अन्न व औषध प्रशासन विभागाचे पुणे विभागाचे सहआयुक्त (अन्न) दिगंबर भोगावडे यांची भेट घेऊन चर्चा केली आणि मागण्यांचे निवेदनही दिले.
बनावट पनीर ओळखण्याबाबत ग््रााहकात जागरूकता निर्माण करणे, अन्न व्यावसायिकांमध्ये नियमांचे पालन सुनिश्चित करणे, सुरक्षित व दर्जेदार दुग्धजन्य पदार्थांची उपलब्धता वाढविणे यासाठी संयुक्त पातळीवर कार्य करण्यासाठी आज झालेल्या अन्न व औषध प्रशासन विभागातील संयुक्त बैठकीत काही सकारात्मक निर्णय घेतले आहेत. त्यासाठी लवकरच ग््रााहकांमध्ये जनजागृती व अंमलबजावणीसाठी संयुक्त कार्यक्रम हाती घेतला जाईल.
गोपाळराव म्हस्के, अध्यक्ष, दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघ