

पुणे; पुढारी वृत्तसेवा : धार्मिक, राजकीय तसेच अन्य कार्यक्रमांमध्ये लावण्यात येणारे ध्वनिवर्धक आणि लेझर बीम वापराविरोधात अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. राज्याचे मुख्य सचिव, कायदा आणि न्याय विभाग, पोलिस महासंचालक आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाला यामध्ये प्रतिवादी करण्यात आले आहे. सण, कार्यक्रम आणि मिरवणुकांमधील कर्णकर्कश ध्वनिवर्धकाच्या दणदणाटामुळे अनेकांना आरोग्य समस्यांचा सामना करावा लागत असून, लेझर लाइटच्या वापरामुळे दृष्टिपटलावरही परिणाम झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर शहरातील काही राजकीय व्यक्तींनी एकत्र येत दोन जनहित याचिका दाखल करणार असल्याचे सोमवारी जाहीर केले, तर दुसर्याच दिवशी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने उच्च न्यायालयातील अधिवक्ता अॅड. सत्या मुळ्ये यांच्यामार्फत जनहित याचिका दाखल केली आहे.
हेही वाचा