टीचर्स प्रोफाईल अद्ययावत करा; अन्यथा कारवाई; पुणे विद्यापीठाचा महाविद्यालयांना इशारा

टीचर्स प्रोफाईल अद्ययावत करा; अन्यथा कारवाई; पुणे विद्यापीठाचा महाविद्यालयांना इशारा

पुणे; पुढारी वृत्तसेवा : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न सर्व महाविद्यालये, मान्यताप्राप्त परिसंस्थांमधील अध्यापकांना शिक्षक मान्यता मिळविण्यासाठी संबंधित अध्यापकांना त्यांची माहिती टीचर्स प्रोफाईलमध्ये भरणे आवश्यक आहे; अन्यथा त्या अध्यापकांना शिक्षक मान्यता देण्यामध्ये तांत्रिक अडथळे निर्माण होतात. त्यामुळे टीचर्स प्रोफाईल अद्ययावत न करणार्‍या महाविद्यालयांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा शैक्षणिक विभागाचे उपकुलसचिव मुंजाजी रासवे यांनी दिला आहे.

रासवे यांनी दिलेल्या निर्देशानुसार, अद्यापही बरीच महाविद्यालये व परिसंस्थांनी त्यांच्याकडे कार्यरत अध्यापकांचे टीचर्स प्रोफाईल अद्ययावत केलेले नाहीत. तसेच सेवामुक्त करण्यात आलेल्या किंवा फक्त शैक्षणिक वर्षाकरिता कार्यरत असलेल्या अध्यापकांचे नाव संबंधित परिसंस्था, महाविद्यालयांमधून संबंधित शैक्षणिक वर्ष पूर्ण झाल्यानंतर किंवा नंतरही संबंधित अध्यापक सेवेत नसतानाही त्या परिसंस्था महाविद्यालयाच्या टीचर्स प्रोफाईलमध्ये दिसून येत आहेत.

त्यामुळे परिसंस्था, महाविद्यालयात कार्यरत अध्यापकांचे प्रोफाईल त्वरित अद्ययावत करावेत, सेवामुक्त करण्यात आलेल्या किंवा फक्त शैक्षणिक वर्षाकरिता कार्यरत असलेल्या अध्यापकांचे नाव संबंधित परिसंस्था, महाविद्यालयांमधून ते शैक्षणिक वर्ष पूर्ण झाल्यानंतरही टीचर्स प्रोफाईल कमी न केल्यास संबंधित संस्था, महाविद्यालयाविरुध्द प्रचलित नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news