PMC Election Politics: कसबा प्रभागात धंगेकर विरुद्ध बीडकर प्रतिष्ठा पुन्हा पणाला! पुणे महापालिका निवडणुकीत तिरंगी लढतीची शक्यता

भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेनेला संधी; धंगेकर कुटुंबातील सदस्य मैदानात उतरणार? बदललेल्या समीकरणांमुळे इच्छुकांची मोर्चेबांधणी.
PMC Election Politics
PMC Election PoliticsPudhari
Published on
Updated on

प्रभाग क्रमांक 24

प्रज्ञा केळकर-सिंग

कसबा पेठ आणि पुणे कॅन्टोन्मेंट अशा दोन विधानसभा मतदारसंघात विभागल्या गेलेल्या कसबा गणपती-कमला नेहरू हॉस्पिटल-केईएम हॉस्पिटल या प्रभागाने (क्र.24) गेल्या काळात भाजपसह काँग्रेस आणि शिवसेनेला साथ देण्याचे काम केले आहे. आगामी महापालिका निवडणुकीतही या प्रभागात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. यानिमित्ताने पारंपरिक विरोधक असलेले बीडकर आणि धंगेकर यांची राजकीय प्रतिष्ठा पुन्हा एकदा पणाला लागणार आहे.

PMC Election Politics
PMC Election Problems: अश्वासने तीच, समस्याही त्याच! जुन्या पुण्यातील ऐतिहासिक प्रभागात पाण्याचा संघर्ष, ट्रॅफिक जाम आणि पुनर्विकासाचा वांधा

प्रभागाची लोकसंख्या : 76,233

अनुसूचित जाती (एससी) : 8043

अनुसूचित जमाती (एसटी) : 639

महापालिकेच्या 2017 मधील निवडणुकीत कसबा पेठ-सोमवार पेठ-मंगळवार पेठ या प्रभागातील (क्र.16) कागदीपुराचा भाग वगळून त्यात आता नव्याने पद्मजी पार्क, न्यू रास्ता पेठ, न्यू नाना पेठ हा भाग जोडून कसबा गणपती- कमला नेहरू हॉस्पिटल- केईएम हॉस्पिटल हा प्रभाग (क्र. 24) नव्याने तयार करण्यात आला आहे. या प्रभागात आगामी निवडणुकीसाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), सर्वसाधारण प्रवर्ग (महिला) आणि दोन जागा सर्वसाधारण प्रवर्ग, असे आरक्षण पडले आहे.

PMC Election Politics
Ramesh Bodke Shiv Sena: शिस्तबद्ध शिवसैनिक रमेश बोडके यांच्या राजकीय प्रवासातील अविस्मरणीय आठवण! गुरुविरुद्धच लढावी लागली महापालिकेची निवडणूक

प्रभागातील राजकीय समीकरणे पाहिल्यास कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ हा 2023 च्या पोटनिवडणुकीचा अपवाद वगळता भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र या मतदारसंघाचा बहुतांश भाग असलेल्या प्रभाग क्रमांक 24 मधील मतदारांनी गेल्या काळात काँग्रेस, शिवसेना आणि भाजप या तीनही पक्षांसह अपक्षांना साथ देण्याचे काम केले आहे. 2017 मधील महापालिका निवडणुकीत या भागातून म्हणजेच जुन्या प्रभागातून भाजपचे योगेश समेळ, काँग्रेसच्या सुजाता शेट्टी, शिवसेनच्या पल्लवी जावळे आणि काँग्रेस पुरस्कृत रवींद्र धंगेकर हे विजयी झाले होते. त्या वेळी मोदी लाट असतानाही भाजपला फक्त एक जागा जिंकता आली होती. याच प्रभागात रवींद्र धंगेकर यांनी भाजपचे तत्कालीन सभागृह नेते गणेश बीडकर यांचा पराभव केला होता.

PMC Election Politics
PMC Ward 15 Election: माजी लोकप्रतिनिधी उतरणार निवडणुकीच्या रिंगणात

त्यांचा हा पराभव भाजपच्या जिव्हारी लागला होता. आगामी महापालिका निवडणुकीला सामोरे जाताना आता अनेक राजकीय समीकरणे बदलली आहेत. धंगेकर हे आमदार होऊन गेल्याने ते महापालिका निवडणुकीत उतरणार नाहीत. त्यांच्या ऐवजी त्यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर अथवा मुलगा प्रणव धंगेकर निवडणूक लढवेल अशी शक्यता आहे. भाजपकडून या प्रभागात माजी सभागृह नेते आणि भाजप महापालिका निवडणूक प्रमुख गणेश बिडकर निवडणूक लढविण्याची तयारी करीत आहेत. गत निवडणुकीत झालेल्या अनपेक्षित पराभवामुळे बीडकर यांनी थेट मैदानात उतरून जोरदार तयारी केली आहे. या वेळेस आता पुन्हा धंगेकर विरुद्ध बिडकर असा सामना रंगणार का याबाबत साशंकता आहे. धंगेकर यांच्या पत्नीने निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्यास त्या ओबीसी महिला या जागेवरून निवडणूक लढवतील, त्यामुळे बिडकरांचा त्यांच्याशी सामना होणार नाही.

PMC Election Politics
PMC Incorporated Villages Neglect: 'आगीतून फुफाट्यात पडलो!' PMC मध्ये समाविष्ट होऊनही मांजरी-केशवनगर-शेवाळेवाडीचा विकास रखडला; मूलभूत सुविधांसाठी नागरिक त्रस्त

मात्र, पत्नी ऐवजी धंगेकरांच्या मुलाने निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतल्यास धंगेकर आणि बिडकर आमने-सामने येऊ शकतात. तर मागील निवडणुकीत शिवसेनेकडून अनुसूचित जाती प्रवर्गातून निवडून आलेल्या पल्लवी जावळे यांनी शिवसेनेतील फुटीनंतर भाजपमध्ये प्रवेश केला. त्या पुन्हा इच्छुक आहेत, मात्र, या प्रभागात अनुसूचित जाती प्रवर्गाचे आरक्षण नसल्याने त्यांना आता थेट महिला सर्वसाधारण जागेवरून निवडणूक लढवावी लागेल अथवा अन्य प्रभागाचा विचार करावा लागेल. तर काँग्रेसकडून निवडून आलेल्या सुजाता शेट्टी यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. आता त्यांचे पती सदानंद शेट्टी हे सुद्धा निवडणूक लढविण्याची तयारी करीत आहेत. गत निवडणुकीत एकच जागा जिंकणाऱ्या भाजपकडून चार जागांसाठी जवळपास दहा ते बारा जण इच्छुक आहेत, तर काँग्रेसचे दोन आणि शिवसेनेचा एक नगरसेवक निवडून येऊनही या दोन्ही पक्षांकडून इच्छुकांची संख्या तुलनेने कमी आहे.

PMC Election Politics
Pune Election Campaign Strategies: निवडणुकीत मतांसाठी काय वाट्टेल ते! 'पैसा-बिर्याणी' पासून ते 'कुकरच्या झाकणां'पर्यंत; वाचा प्रचाराच्या नाना तऱ्हा...

विविध पक्षांतील इच्छुक उमेदवार

भाजप : गणेश बीडकर, कल्पना बहिरट, उज्वला यादव, देवेंद्र वडके, योगेश जगताप, योगेश समेळ, राहुल शर्मा, यश वालिया, पल्लवी जावळे, संदीप इंगळे.

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) : सदानंद शेट्टी, सुजाता शेट्टी, विनोद काळोखे, सचिन तांबे, शेखर धावडे.

शिवसेना (शिंदे गट) : प्रतिभा धंगेकर, प्रणव धंगेकर, सुदर्शना त्रिगुणाईत, हनुमंत दगडे.

PMC Election Politics
PMC Ward 41 Election: पुण्याच्या प्रभाग ४१ मध्ये महायुती vs महाआघाडी! भाजप आणि राष्ट्रवादीकडे इच्छुकांची मोठी गर्दी, 'काटे की टक्कर'

काँग्रेस : नितीन परतानी, शिफा फिरोज शेख, सुनील काकडे, राजेश मोहिते, रवी आरडे, मोजेश गवारे.

मनसे : बाळा शेडगे, माऊली जाधव, अनिता डाखवे.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) : सचिन शिंदे, समीर दळवी.

शिवसेना (ठाकरे गट) : राजेश मोरे, मुकुंद चव्हाण.

आरपीआय (आठवले गट) : नीलेश आल्हाट.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news