

पुणे: मोक्का ( महाराष्ट्र संघटित गुन्हेगारीविरोधी कायदा), तडीपारी आणि एमपीडीए (स्थानबद्धता) या त्रिसूत्री कारवाईमुळे पुणे जिल्हा पोलिसांनी जिल्ह्यातील गुन्हेगारीचे कंबरडे मोडले असल्याचे दिसून येते. ग््राामीण परिसरातील गंभीर गुन्ह्यांच्या घटनेमध्ये मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. 2024 मध्ये 90 खुनाच्या घटना घडल्या होत्या, तर 2025 मध्ये घट होऊन हा आकडा 82 वर आला आहे. जबरी चोरींच्या घटनामध्ये मात्र वाढ झाल्याचे दिसते.
ग््राामीण पोलिसांसमोर आज अनेक आव्हाने उभी आहेत. झपाट्याने वाढणारे शहरीकरण, ग््राामीण भागात शिरकाव करणारी संघटित गुन्हेगारी, आंतरजिल्हा व आंतरराज्य टोळ्यांची हालचाल, अमलीपदार्थांची तस्करी तसेच मर्यादित मनुष्यबळ आणि विस्तीर्ण भौगोलिक कार्यक्षेत्र ही मोठी अडचण आहे. याशिवाय तांत्रिक गुन्हे, सोशल मीडियाचा गैरवापर आणि नागरिकांच्या वाढत्या अपेक्षाही पोलिसांसाठी कसोटी ठरत आहेत. या आव्हानांवर ग््राामीण पोलिसांनी प्रभावी प्रतिबंधात्मक कारवाई, गुन्हेगारांची हिस्ट्रीशीट तपासणी, रात्रीचे गस्त पथक, गुप्त माहितीवर आधारित धडक कारवाया आणि नागरिकांशी समन्वय साधत मात केली आहे. कायद्याचा धाक, तंत्रज्ञानाचा वापर आणि तत्पर तपासामुळे गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यात पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांच्या मार्गदर्शनात ग््राामीण पोलीस यशस्वी ठरत आहेत.
ग््राामीण पोलिसांकडून जबरी चोरीच्या घटना एकीकडे 172 वरून 215 झालेल्या असताना दुसरीकडे पोलिसांच्या नियोजनबद्ध योजनेमुळे घरफोडीच्या संख्या 629 वरून 466 वर आली आहे. दुचाकीचोरीच्या घटनांध्ये 987 वरून या घटना 802 वर आला आहे, तर इतर चोरीच्या घटना 2024 मध्ये 1 हजार 171 होत्या, तर याच घटनांमध्ये 1 हजार 27 वर आल्या आहेत. सर्वांत डोकेदुखी ठरणाऱ्या चोऱ्या म्हणजे ट्रान्सफार्मरचोरीमुळे मागील काही काळात ग््राामीण पोलिसांना हैराण करून सोडले होते. अशा गुन्ह्यात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. हे गुन्हे 278 वरून 170 वर आणण्यास ग््राामीण पोलिसांना यश आले आहे.
गिल्ल यांनी काय बदलले
संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर कठोर कारवाई करून गुन्हेगारीचे कंबरडे मोडले
आंतरजिल्हा व आंतरराज्य टोळ्यांचा पर्दाफाश करून आरोपींना अटक
मोक्का, एमपीडीए, हद्दपारीसारख्या कायद्यांचा प्रभावी वापर
मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुन्हे उघडकीस
चोरी, घरफोडी, दरोडे प्रकरणांत मुद्देमाल जप्त करून रिकव्हरी वाढवली
अमलीपदार्थांची तस्करी उधळून लावून कोट्यवधींचा साठा जप्त
अवैध शस्त्रसाठ्यावर कारवाई करून गुन्हेगारांचे नेटवर्क तोडले
गंभीर गुन्ह्यांचा तपास जलदगतीने पूर्ण करून दोषारोपपत्र दाखल
प्रतिबंधात्मक कारवाईतून संभाव्य गुन्हे आधीच रोखले
रात्रीची गस्त, नाकाबंदी व कोम्बिंग ऑपरेशन प्रभावीपणे राबवले
नागरिकांशी समन्वय वाढवून पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ केला
तुलना 2024 आणि 2025
खून: 90/ 82
दरोडा: 16 /16
घरफोडी चोरी: 629/ 466
जबरी चोरी: 172/ 215
दुचाकीचोरी: 987/ 802
इतर चोरी: 1171/ 1027
ट्रान्सफार्मर चोरी: 278 /170
एमपीडीए: .../10
बीएनएस: 111/ 38
बीएनएस: 112/ 38
मोक्का कारवाई: 4 (34 गुन्हेगार)
पिस्तुल जप्त: 39 पिस्तुले (78 काडतुसे)
अनोळखी मृतदेहावरून खुनाच्या 9 घटनांचा छडा
जिल्ह्यातील विविध भागांत आढळून आलेल्या 9 अनोळखी मृतदेहाची ओळख पटवून कौशल्यपूर्वक तपास करून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी खुनाचा छडा लावला आहे. अशा गुन्ह्यांचा तपास करून पोलिसांनी आरोपींना गजाआड केले आहे. 2025 या वर्षात जिल्ह्यात 88 खुनाचे गुन्हे घडले असून, त्यातील 82 गुन्ह्यांचा छडा एकट्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मागर्दर्शनाखाली लावला आहे.
गुन्हेगारांच्या बंदोबस्तासाठी प्रतिबंधात्मक कारवाईवर भर, सतत गुन्हे घडणाऱ्या परिसराचे विश्लेषण करून सूत्रबद्ध योजना तयार केली. त्याचबरोबर लोकाभिमुख पोलिसिंगवर भर दिला. दरोडा, चोऱ्या रोखण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या एका विशेष पथकाची स्थापना करून सराईत गुन्हेगारांची यादी तयार करून त्यांच्यावर नियंत्रण ठेवले. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत 2025 वर्षातील गंभीर गुन्ह्यांच्या घटनाबरोबरच घरफोडी, चोरीच्या घटना कमी करण्यात पुणे ग््राामीण पोलिसांना यश आले आहे.
संदीपसिंह गिल्ल, पोलिस अधीक्षक, पुणे ग््राामीण