भोर : भाटघर धरणात अवघा पावणेदोन टीएमसी साठा

भोर : भाटघर धरणात अवघा पावणेदोन टीएमसी साठा

भोर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : भाटघर आणि निरा देवघर धरण जलाशयाची पाणीपातळी वाढत्या उष्णतेमुळे झपाट्याने घटत चालली आहे. भाटघर धरणात अवघा 1.75 टीएमसी म्हणजे 6 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. धरणातील विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. निरा देवघर धरण जलाशयात 1.8 टीएमसी साठा शिल्ल्क आहे. धरणातून पूर्वेकडील भागातील लोकांचे पिण्यासाठी पाण्याचा विसर्ग होत आहे. त्यामुळे निरा नदीचे पात्र ऐन उन्हाळ्यात वाहताना दिसत आहे.

भोर शहराला भाटघर धरण जलाशयातून पाणीपुरवठा केला जातो. सध्या धरणातील पाणी झपाट्याने कमी होत असल्याने नागरिकांनी पिण्याचे पाणी जपून वापरावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. नुकतेच कार्यकारी अभियंता घोडपकर आणि उपविभागीय आभियंता बी. जी. नलावडे यांनी भाटघर आणि निरा देवघर धरणातील पाणीपातळीची पाहणी केली अशी माहिती शाखा अभियंता प्रशांत देसले, चरण किवडे, तंत्रज्ञ नाना कांबळे यांनी दिली.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news