Omkar Sugarcane Rate: ओंकार शुगरकडून शेतकऱ्यांना प्रतिटन ३६०० रुपयांची पहिली उचल जमा

यवत येथील कारखान्याची घोषणा; आगामी हंगामात प्रतिटन ३८०० रुपये दर देण्याचे आश्वासन
Sugar Factory
Sugar Factory Pudhari
Published on: 
Updated on: 

खुटबाव: दौंड तालुक्यातील यवत येथील ओंकार रिन्यूएबल शुगर्स अँड बायोफ्युएल्स प्रा. लिमिटेड (युनिट क्रमांक १२) यांच्याकडून गाळप हंगाम २०२६-२७ मध्ये १५ नोव्हेंबरपर्यंत कारखान्याला आलेल्या उसासाठी शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रतिटन ३६०० रुपये पहिली उचल जमा करण्यात आली आहे. दौंड तालुक्यातील सर्वाधिक पहिली उचल देण्यात आल्याचा दावा कारखाना प्रशासनाने केला आहे.

Sugar Factory
Bhatghar Dam Backwater Road: भाटघर धरणाच्या बॅकवॉटरकडे जाणारा रस्ता रात्री बंद; बसरापूर ग्रामपंचायतीचा निर्णय

ओंकार ग्रुपने स्थापनेपासूनच ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिले आहे. शेतकऱ्यांच्या घामाला आणि कष्टाला योग्य मोबदला मिळावा, तसेच त्यांची आर्थिक परिस्थिती सक्षम व्हावी, या उद्देशाने ग्रुप सातत्याने प्रयत्नशील आहे, असे अध्यक्ष बाबूराव बोत्रे-पाटील यांनी सांगितले.

Sugar Factory
MSRTC Electric Bus Project Loss: इलेक्ट्रिक बसमुळे एसटीला १६८ कोटींचा तोटा; कर्मचाऱ्यांची अनुदानाची मागणी

बोत्रे-पाटील म्हणाले की, ओंकार ग्रुप ऊसदराच्या बाबतीत कधीही मागे राहिलेला नाही आणि भविष्यातही राहणार नाही. शेतकऱ्यांचा स्वाभिमान जपणे, त्यांच्या कष्टाला योग्य मोबदला देणे आणि आर्थिक उन्नतीला हातभार लावणे, या उद्देशाने ग्रुपची वाटचाल सुरू आहे. शेतकरी हिताचे निर्णय घेण्यास ग्रुप नेहमीच कटिबद्ध राहील.

Sugar Factory
Fairness Cream Mercury Exposure: गोरेपणाच्या क्रीमचा कथित दुष्परिणाम; तरुण आयसीयूमध्ये, उपचारांवर १२ लाखांचा खर्च!

कारखान्याच्या प्रगतीत शेतकऱ्यांचा मोलाचा वाटा असून, त्यांच्या कष्टाला योग्य मोबदला देणे ही आमची नैतिक जबाबदारी आहे. कारखान्याचे जनरल मॅनेजर राजेश थोरात म्हणाले, ओंकार शुगर ग्रुपचे अध्यक्ष बाबूराव बोत्रे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी हिताचा विचार करून उसाचा दर जाहीर करण्यात आला आहे.

Sugar Factory
Kurkumbh MIDC Blast: कुरकुंभ एमआयडीसीतील त्रिमूर्ती फार्मा कंपनीत भीषण स्फोट; सुरक्षा यंत्रणा अनभिज्ञ!

त्यानुसार उसाची रक्कमही वेळेत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे. आगामी गाळप हंगाम २०२६-२७ मध्ये कारखान्याला येणाऱ्या उसाला प्रतिटन ३८०० रुपये दर देण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस कारखान्याला घालावा, असे आवाहन त्यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.