MSRTC Electric Bus Project Loss: इलेक्ट्रिक बसमुळे एसटीला १६८ कोटींचा तोटा; कर्मचाऱ्यांची अनुदानाची मागणी

प्रतिमागे २० ते २५ रुपये अनुदान देण्याची मागणी; तोटा भरून द्या, अन्यथा प्रकल्प बंद करा, एसटी कर्मचाऱ्यांचा इशारा
MSRTC Electric Bus
MSRTC Electric BusPudhari
Published on: 
Updated on: 

जळोची: इलेक्ट्रिक बस प्रकल्पामुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला (एसटी) ऑक्टोबर २०२६ पर्यंत १६८ कोटी रुपयांचा तोटा झाल्याचा दावा महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसने केला आहे. गुजरात आणि उत्तर प्रदेशच्या धर्तीवर राज्य सरकारने प्रतिकिलोमीटर २० ते २५ रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी एसटी कर्मचाऱ्यांनी केली आहे. या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. इलेक्ट्रिक बस प्रकल्पामुळे होणारा तोटा सरकारने भरून द्यावा किंवा ही योजना बंद करावी, असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

MSRTC Electric Bus
Fairness Cream Mercury Exposure: गोरेपणाच्या क्रीमचा कथित दुष्परिणाम; तरुण आयसीयूमध्ये, उपचारांवर १२ लाखांचा खर्च!

एसटीच्या इलेक्ट्रिक बसमुळे सरासरी प्रतिकिलोमीटर १६ रुपयांचा तोटा होत आहे. ऑक्टोबर २०२६ पर्यंत तो १६८ कोटी रुपयांवर पोहचला आहे. गुजरात आणि उत्तर प्रदेशमध्ये इलेक्ट्रिक बसचे संचालन आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य करण्यासाठी संबंधित राज्य सरकारांकडून प्रतिकिलोमीटर सरासरी २० ते २५ रुपये आर्थिक मदत दिली जाते. त्याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारनेही एसटीला आर्थिक साहाय्य करावे, अशी मागणी एसटी कर्मचाऱ्यांनी केली आहे.

MSRTC Electric Bus
Kurkumbh MIDC Blast: कुरकुंभ एमआयडीसीतील त्रिमूर्ती फार्मा कंपनीत भीषण स्फोट; सुरक्षा यंत्रणा अनभिज्ञ!

सरकारचे २०४७ पर्यंत रस्त्यांवर पर्यावरणपूरक वाहने आणण्याचे धोरण आहे. मात्र, अशा वाहनांच्या संचालनामुळे होणारा आर्थिक तोटा भरून काढण्यासाठी व्यवहार्यता तफावत निधी उपलब्ध करून देणे आवश्यक असताना सरकार स्वतःच्याच धोरणापासून मागे हटत असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. १३ फेब्रुवारी २०२४ रोजी ठाण्यात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले होते. त्या वेळी मे २०२५ पर्यंत १,२८८ आणि मे २०२६ पर्यंत एकूण ५,१५० इलेक्ट्रिक बस पुरवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते.

MSRTC Electric Bus
Pune Encroachment Drive: पुण्यात अतिक्रमण कारवाईत राजकीय दबाव खपवून घेणार नाही; आयुक्त स्वतः मैदानात उतरणार!

मात्र, नोव्हेंबर २०२६ पर्यंत एसटीच्या ताफ्यात केवळ १,३०० बस दाखल झाल्या आहेत. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी बसपुरवठादार कंपनीसोबत बैठक घेऊन सुधारित वेळापत्रक निश्चित केले होते. त्यानंतरही अपेक्षित पुरवठा झाला नाही. या प्रकल्पामुळे एसटीच्या आर्थिक अडचणी वाढल्या असून, दैनंदिन कामकाजासाठी निधीची कमतरता भासत आहे. कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते आणि वेतनवाढीच्या फरकाच्या देयकांवरही त्याचा परिणाम होत आहे, असा आरोप एसटी कर्मचारी करीत आहेत.

MSRTC Electric Bus
Court Employees Salary Hike: न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा मार्ग मोकळा होणार? त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्याचा निर्णय

सरकारने इलेक्ट्रिक बस प्रकल्प रद्द करून एसटीला स्वमालकीच्या बस खरेदी करण्याची परवानगी द्यावी किंवा प्रकल्पामुळे झालेल्या संपूर्ण तोट्याची भरपाई करावी. सरकारने तातडीने निर्णय न घेतल्यास आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्यात कर्मचारी रस्त्यावर उतरतील.

श्रीरंग बरगे, सरचिटणीस, एसटी कर्मचारी इंटक युनियन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.