

पुणे: पक्षाचा आदेश असतानाही उमेदवारी अर्ज मागे घेण्यास नकार देणाऱ्या राष्ट्रवादी काँग््रेास शरदचंद्र पवार पक्षाच्या पाच उमेदवारांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. तसेच राष्ट्रवादी काँग््रेास पक्षाच्या घड्याळ चिन्हावरील उमेदवारांना पक्षाने अधिकृत पाठिंबा दर्शविला आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग््रेास (अजित पवार) आणि राष्ट्रवादी काँग््रेास शरदचंद्र पवार पक्षाची अधिकृत आघाडी झाली आहे. मात्र, ऐनवेळी दोन्ही पक्षांनी आपापल्या उमेदवारांना उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सांगून एबी फॉर्म दिले होते. परिणामी अनेक प्रभागांमध्ये दोन्ही पक्षांचे उमेदवार एकमेकांसमोर आले होते. अखेर दोन्हीकडील नेत्यांनी बहुतांश उमेदवारांना माघार घेण्यास भाग पाडले होते.
दरम्यान, हडपसर गाव-सातववाडी (प्रभाग 16) येथे राष्ट्रवादी काँग््रेास पक्षाने वैशाली बनकर (अ), वर्षा पवार (ब), कमलेश कापरे (क) आणि योगेश ससाणे (ड) यांना घड्याळ चिन्हावर उमेदवारी दिली होती. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग््रेास शरदचंद्र पवार पक्षाने भाग्यश्री जाधव आणि अविनाश काळे यांना उमेदवारी दिली होती. त्यांनाही माघार घेण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, त्यांनीही पक्षाचे आदेश डावलले.
तसेच नवी पेठ-पर्वती (प्रभाग 27) येथे राष्ट्रवादी काँग््रेास पक्षाने धनंजय जाधव (अ), दीपाली बारवकर (ब), अक्षता लांडगे (क) आणि अशोक हरणावळ (ड) यांना घड्याळ चिन्हावर अधिकृत उमेदवारी दिली, तर याच प्रभागात राष्ट्रवादी काँग््रेास शरदचंद्र पवार पक्षाकडून दिलीप अरुंदेकर (अ), अक्षदा गदादे (ब) आणि अनिकेत ऊर्फ राकेश क्षीरसागर (ड) यांना उमेदवारी देण्यात आली होती. दोन्ही पक्षांची आघाडी झाल्यानंतर अरुंदेकर, गदादे आणि क्षीरसागर यांना माघार घेण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, त्यांनी पक्षाचा आदेश झुगारून लावला. या पार्श्वभूमीवर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दिलीप अरुंदेकर, अक्षदा गदादे, अनिकेत ऊर्फ राकेश क्षीरसागर, भाग्यश्री जाधव आणि अविनाश काळे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली आहे.
शिस्तभंगाची कारवाई का करण्यात आली?
राष्ट्रवादी काँग््रेास पक्षाने दिलेल्या उमेदवारांच्या प्रभागांमध्ये राष्ट्रवादी काँग््रेास शरदचंद्र पवार पक्षाकडूनही उमेदवारी देण्यात आली होती. दोन्ही पक्षांची आघाडी झाल्यानंतर संबंधित उमेदवारांना माघार घेण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले होते. मात्र, काही उमेदवारांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने ही शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे.