Monsoon Forecast India: अल निनो सक्रिय होणार, तरीही मान्सूनला 14 निकषांचा आधार

आयओडी, एमजेओसह अनेक हवामान घटक अनुकूल; यंदा पाऊस सामान्य ते चांगला राहण्याची शक्यता
Monsoon
MonsoonPudhari
Published on
Updated on

पुणे: आयओडी अर्थात भारतीय समुद्री स्थिरांक सध्या अनुकूल असल्याने मान्सूनचा वेग उत्तम आहे. तसेच, एमजेओ (मॅडन ज्युलियन ऑसिलेशन) हा निकष या आठवड्यात समजणार आहे. त्यावर मान्सूनची प्रगती ठरेल. जूनमध्ये अल निनो सक्रिय होणार असला, तरी एकूण 14 निकष आहेत, ज्यावर मान्सूनची पुढची प्रगती ठरणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

Monsoon
Baramati News: बारामतीत सावकारीच्या त्रासाला कंटाळून युवकाची आत्महत्या; पाच जणांविरोधात गुन्हा

यंदा जूनच्या सुमारास प्रशांत महासागरात अल निनो सक्रिय होईल, असा अंदाज अनेक हवामान संस्था आणि तज्ज्ञांनी दिला आहे. मात्र, काही भारतीय शास्त्रज्ञांच्या मते अल निनो हा एकटाच मान्सूनला बाधा पोहचवू शकत नाही. प्रामुख्याने आयओडीसह आणखी 14 निकष आहेत, ज्यावर मान्सूनचा प्रवास अवलंबून आहे. सध्या ज्या वेगाने मान्सून भारताच्या दिशेने येत आहे, त्यावरून भारतीय तज्ज्ञांनी दिलेले अंदाज बरोबर ठरतील, अशी आशा आहे.

Monsoon
Pune Weather Update: प्री-मान्सूनच्या पावसाने पुणेकरांना दिलासा; अडीच महिन्यांनंतर तापमान 34 अंशांवर

...हे आहेत ते 14 निकष

  • अल निनो (प्रशांत महासागरातील पाण्याचे वाढते तापमान) भारतात कमी पाऊस होण्याची शक्यता असते.

  • ला निना (प्रशांत महासागरातील पाण्याचे तापमान) कमी असले तर भारतीय मान्सून चांगला होतो.

  • आयओडी (इंडियन ओशन डायपोल) अर्थात भारतीय समुद्री स्थिरांक हिंदी महासागरातील पाण्याच्या तापमानाची स्थिती.

  • एनएसओ (अल -निनो सदर्न ऑसिलेशन) मान्सूनच्या ताकदीवर परिणाम

  • एसएसटी (अरबी समुद्राचे समुद्रपृष्ठ तापमान अधिक असल्यास बाष्पीभवन वेगाने होऊन पाऊस वाढतो.

  • सध्या ही स्थिती चांगली आहे.

Monsoon
Pune Local Body Election: पुणे जागेवरून महायुतीत रस्सीखेच; राष्ट्रवादीचा भाजपवर हक्काचा दावा
  • बंगालच्या उपसागराचे तापमान (कमी दाब क्षेत्रे आणि मान्सून प्रणाली तयार होण्यासाठी महत्त्वाचे.

  • क्रॉस इक्वेटोरिअल वारे (दक्षिण गोलार्धातून भारताकडे येणारे दमट वारे) याला मान्सूनचे मुख्य इंधनस्रोत मानले जाते.

  • सोमली जेट (आफिकेजवळ वेगवान मान्सून वाऱ्यांची प्रणाली मजबूत असेल तर पाऊस चांगला पडतो.)

  • मॅडन ज्युलियन ऑसिलेशन (एमजेओ) ः ढग, पर्जन्य आणि चक्रीवादळनिर्मितीवर प्रभाव टाकतो म्हणून महत्त्वाचा निकष आहे.

  • हिमालयातील हिमसाठा : जास्त हिमसाठा काहीवेळा मान्सून कमकुवत करू शकतो.

  • युरेशियन स्नो कव्हर : युरोप-आशियातील बर्फाच्छादन, भारतीय उन्हाळी तापमान आणि मान्सूनवर परिणाम करतो.

  • उत्तर हिंदी महासागरातील दाब स्थिती (कमी दाबाचे पट्टे तयार करण्यास मदत होते.)

  • जेट स्ट्रीम : हवेच्या वरच्या थरातील वारे मान्सूनच्या प्रगतीसाठी महत्त्वाची भूमिका बजावतात.

  • भारतीय भूभागाचे मान्सूनपूर्वीचे म्हणजे उन्हाळ्यातील तापमान एप्रिल, मेमध्ये कडक उन्हाळा असल्यास कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊन मान्सून खेचला जातो आणि वेगाने प्रगती होते. सध्या ही स्थिती भारतीय मान्सूनला पूरक आहे.

Monsoon
Pune Land Scam: वेल्हे-राजगड परिसरात जमीन दलालांचा विळखा; शेतकऱ्यांची मोठी फसवणूक

यंदाची ही स्थिती महत्त्वाची

  • काही भारतीय शास्त्रज्ञांच्या मते अल निनो मर्यादित राहू शकतो.

  • हिंदी महासागरातील स्थिती मान्सूनला बळकटी देत आहे.

  • अरबी समुद्रात उष्णता आणि दमट वारे सक्रिय आहेत.

  • एमजेओ आणि आयओडी पुढील आठवड्यात निर्णायक ठरू शकतात.

  • त्यामुळे अल निनो सक्रिय असला तरी भारतात यंदा मान्सून सामान्य ते चांगला पडू शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news