Pune Local Body Election: पुणे जागेवरून महायुतीत रस्सीखेच; राष्ट्रवादीचा भाजपवर हक्काचा दावा

370 जागांच्या संख्याबळाचा दावा करत राष्ट्रवादी काँग्रेसचा भाजपवर जोरदार हक्क; उमेदवारीवर मंगळवारी निर्णय शक्य
Pune Municipal Corporation
Pune Municipal CorporationPudhari
Published on
Updated on

पुणे: पुणे स्थानिक स्वराज्य संस्थेची जागा राष्ट्रवादी काँग््रेासच्या हक्काची असून, आमच्याकडे सर्वाधिक 370 जागांचे संख्याबळ आहे. त्यामुळे स्वाभाविक आणि न्यायाने ही जागा आमचीच असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग््रेासकडून करण्यात आला आहे. केवळ राजकीय भूमिका घेण्यासाठी या जागेवर दावा करणे चुकीचे असल्याचे प्रत्युत्तर राष्ट्रवादीकडून भाजपला देण्यात आले आहे.

Pune Municipal Corporation
Pune Land Scam: वेल्हे-राजगड परिसरात जमीन दलालांचा विळखा; शेतकऱ्यांची मोठी फसवणूक

राष्ट्रवादी काँग््रेासचे शहराध्यक्ष सुनील टिंगरे, महापालिकेतील विरोधी पक्षनेते नीलेश निकम व कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख यांनी पत्रकार परिषदेत पक्षाची भूमिका मांडली. विधान परिषदेच्या पुणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागेवरून महायुतीमधील मित्र पक्ष असलेल्या भाजप व राष्ट्रवादीमध्येच रस्सीखेच सुरू आहे.

Pune Municipal Corporation
Pune Metro Water Leakage Video: पुणे मेट्रो डब्यात पाणीगळतीचा व्हिडीओ व्हायरल

मित्रपक्षांच्या आघाड्यासह आमच्याकडे 333 संख्याबळ असल्याचा दावा करीत भाजपने पुण्याच्या जागेची मागणी केली आहे. त्यावर राष्ट्रवादीने प्रत्युत्तर देत भाजपपेक्षा आमच्याकडे अधिक म्हणजेच 370 जागांचे संख्याबळ आहे.

Pune Municipal Corporation
Pune Police Extortion: पुण्यात खाकीला काळिमा; गुटखा वसुली प्रकरणात कारवाई

तसेच या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व राष्ट्रवादीने केलेले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्यांचे संख्याबळ, पक्षाची ताकद आणि जनाधार पाहता या वेळीही ही जागा राष्ट्रवादी काँग््रेासला मिळाली पाहिजे, अशी आग््राही मागणी आम्ही पक्ष प्रमुखांकडे केली असल्याची माहिती शहराध्यक्ष टिंगरे यांनी दिली.

Pune Municipal Corporation
NEET Paper Leak Case Update: नीट पेपरफुटी प्रकरणात नवे धक्कादायक खुलासे

ते पुढे म्हणाले, ‌‘भाजपने मांडलेले गणित चुकलेले आहे. या जागेवरून वाद घालणे चुकीचे आहे. मित्रपक्ष म्हणून राष्ट्रवादीने नेहमीच महायुतीमध्ये समन्वय आणि सहकार्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे आमच्या हक्काच्या जागेबाबत मित्रपक्षांकडूनही त्याच संवेदनशीलतेची आणि सहकार्याची अपेक्षा आहे. आमच्या पक्षात कोणताही वादविवाद नसून, दहापेक्षा अधिक जण इच्छुक आहेत. येत्या मंगळवारी त्यावर मुंबईत निर्णय होईल.‌’

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news